Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग भवनाचे उपक्रम उपयुक्त – सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे
पिंपरी चिंचवड

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग भवनाचे उपक्रम उपयुक्त – सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवनला दिली भेट, लाभार्थी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उपलब्ध सुविधांची घेतली माहिती

पिंपरी, दि. ४ जून २०२६: दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दिव्यांग भवनामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवे बळ मिळत आहे. भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केले.

दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रशांत शितोळे यांनी दिव्यांग भवनाच्या उद्घाटनप्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याचा उल्लेख करताना त्यांनी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. दिव्यांगांच्या परिपूर्ण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यांग बांधवांसाठी सन २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेला ‘पर्पल महा जल्लोष’ हा महापालिकेचा अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. दिव्यांग नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा हा उपक्रम असून, आगामी काळात तो अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह दिव्यांग भवन फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांग भवन येथील विविध सुविधा, सेवा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेतला. भवनातील रुग्ण, लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. ई-लायब्ररी, ऑडिओमेट्री रूम, एक्स्पिरियन्स सेंटर, स्पीच थेरपी विभाग, ग्रंथालय, संगणक कक्ष, संगीत विभाग तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख उपक्रमांची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुमारे २४ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेली दिव्यांग भवनची चार मजली अत्याधुनिक इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी विविध सेवा आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, सुविधा याचा अधिकाधिक लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यक उपाययोजना कराव्यात. भवनात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा आणि सेवांमुळे दिव्यांगांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. दिव्यांग नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परेश गांधी यांनी दिव्यांग भवनबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगजानन हाउसिंग सोसायटी परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
Next Article राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?