पिंपरी, दि. २२ मे : संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यार बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना धारदार लोखंडी सत्तुर जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान अँटी बायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात, पिंपरी येथे आरोपी मोहसीन समीर सव्यद (वय २५, रा. रूम नं. २१, पपया चाळ, खराळवाडी, पिंपरी, पुणे) हा धारदार लोखंडी सत्तुर जवळ बाळगून संशयास्पदरीत्या थांबलेला आढळून आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दि. १३ मे २०२६ ते दि. २६ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असताना आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस शिपाई अक्षय शिवाजी साळुंखे (ब. नं. ४६४७), नेमणूक संत तुकारामनगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोकड करीत आहेत.