Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत इंटरनेट व टी.व्ही. केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा
मनोरंजन

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत इंटरनेट व टी.व्ही. केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 19, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
महापालिकेच्या विद्युत खांबांवर पूर्वपरवानगीशिवाय ओढलेल्या केबल्स धोकादायक; संबंधित ऑपरेटर्सनी ३० दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

पिंपरी, दि. १९ मे २०२६ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेच्या महानगरपालिकेच्या खांबांवरून काही संस्था व व्यक्तींनी टी.व्ही. केबल तसेच इंटरनेटसंबंधित केबल्स अनधिकृतपणे ओढल्याचे निदर्शनास आले आहे. या केबल टाकण्यापूर्वी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसून, महापालिकेकडून अशा प्रकारची कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे विद्युत विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या खांबांवरून अनधिकृतपणे ओढण्यात आलेल्या इंटरनेट व टी.व्ही. केबल्समुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या केबल्समुळे महानगरपालिकेच्या विद्युत खांबांचे व त्यावरील विद्युत व्यवस्थेचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अनधिकृत केबल्समुळे शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असून, याबाबत अनेक नागरिक, अशासकीय सेवाभावी संस्था तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी व सदस्य यांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार, महानगरपालिकेच्या खांबांवर पूर्वपरवानगीशिवाय ओढलेल्या इंटरनेट व टी.व्ही. केबल्स या महानगरपालिकेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण मानले जाते.

प्रत्यक्षात, कोणतीही केबल टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच महानगरपालिकेकडून परवाना प्राप्त झाल्यानंतर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीद्वारे उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर केबल’ (OFC) नेटवर्कचा वापर करणे अथवा त्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणतीही नेटवर्क, टी.व्ही. केबल अथवा इतर प्रकारच्या केबल्स टाकण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधणे बंधनकारक राहणार आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत सर्व संबंधित केबल ऑपरेटर्स व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना पुढील कागदपत्रे त्वरीत सादर करण्याचे आवाहन 

१) वैध परवाना
२) एमएसएमई / जीएसटी प्रमाणपत्र
३) केबल ऑपरेटरचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, स्थानिक कार्यालयाचा पत्ता पुरावा व शॉप अॅक्ट परवाना
४) ऑपरेटरचे केवायसी तपशील – आधार कार्ड / पॅन कार्ड / ओळखपत्र माहिती
५) महापालिकेच्या एसओपी नुसार काम करणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळणे आदी बाबींसंदर्भातील योग्य रकमेच्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र
६) टी.व्ही. / इंटरनेट / दूरध्वनी / वीजपुरवठा व इतर प्रकारच्या केबल्स ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड पद्धतीने कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत टाकण्यात आल्या आहेत, याची तसेच एकूण लांबीची माहिती
७) ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड केबलसाठी यापूर्वी महापालिकेस शुल्क अदा केले असल्यास त्याच्या पावतीची छायांकित प्रत
८) केबल टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या परवान्याची छायांकित प्रत

वरील सर्व कागदपत्रे ३० दिवसांच्या आत विद्युत विभाग, पहिला मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सादर करावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत माहिती व कागदपत्रे सादर न करणाऱ्या केबल ऑपरेटर्सविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा कारवाईमुळे जनतेस होणाऱ्या गैरसोयीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार राहणार नसून, संबंधित केबल ऑपरेटर्स यांनाच त्यासाठी जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऑक्टोपस कोचिंग क्लासेसचा दहावीचा १०० टक्के निकाल; रचना मोहोळ तालुक्यात प्रथम
Next Article २४ मे रोजी निगडीत ‘लागले खूळ कलावंताला’ विशेष अभिवाचन मैफल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण

June 29, 2026

अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

June 10, 2026

कोरिया-भारत संबंधासाठी पीसीयूचा कोसमे पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण – कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू 

June 4, 2026

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार – मंत्री ॲड. आशिष

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?