Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»कोरिया-भारत संबंधासाठी पीसीयूचा कोसमे पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण – कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू 
मनोरंजन

कोरिया-भारत संबंधासाठी पीसीयूचा कोसमे पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण – कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

औद्योगिक विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल – कुलपती हर्षवर्धन पाटील;पीसीयू कोसपीसीयुची मे पुणे बेस कॅम्प करार एक मैलाचा दगड

पिंपरी, पुणे (दि. ०४ जून २०२६) भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये आर्थिक, औद्योगिक संबंध आणखी मजबूत आणि वृद्धिंगत होण्यासाठी पीसीयू आणि कोसमे यांच्या मध्ये झालेला सामंजस्य करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतामध्ये कोरियातील लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यामध्ये कोसमे ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पीसीयू मध्ये कोसमे पुणे बेस कॅम्प हे देशातील एकमेव आहे. याचा उपयोग कोरियन भाषा प्रशिक्षण, प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, कोरियन एसएमइ साठी उत्पादन चाचणी सुविधा आणि उद्योग शैक्षणिक सहकार्य असे विविध उपक्रम पीसीयू मध्ये सुरु करण्यासाठी होईल. यासाठी कोरियन सरकार देखील सकारात्मक आहे असे कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे कोरिया एसएमइ स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या “कोसमे पुणे बेस कॅम्प”चे उद्घाटन कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, प्रादेशिक संचालक, विभागीय संचालक ईशान्य आशिया आणि एशियन कोसमे सुसोक पार्क, व्यवस्थापकीय संचालक कोसमे जीबीसी नवी दिल्ली जेक्यॉन्ग ली, मुख्य व्यापार प्रतिनिधी किटा योंग यून, संचालक सीईपीए नवी दिल्ली सेउंगचांग हा, कार्यकारी संचालक पीसीईटी डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू संतोष सोनवणे, स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान, पीसीयू अधिष्ठाता डॉ. रामदास बिरादार, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी तसेच कोरियन कंपन्यांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांची विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि रोजगार विकासाला महत्व दिले पाहिजे. आता पीसीयू मधील कोरिया एसएमइ अँड स्टार्टअप एजन्सीच्या (कोसमे) भारतातील पहिल्या बेस कॅम्प मुळे महाराष्ट्रात कोरियन कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वेग वाढेल. कोसमे पीसीयू करार म्हणजे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होईल. आता पीसीयूची वाटचाल भारतातील पहिले औद्योगिक विद्यापीठ होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे त्याचा अभिमान वाटतो असे पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी कोसमे पुणे बेस कॅम्पच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र हे कोरियन गुंतवणूक आणि उद्योग विस्तार, रोजगारासाठी चालना मिळेल. एमआयडीसी या केंद्राशी संबंधित कोरियन कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.

सुसोक पार्क यांनी सांगितले की, पुणे हे ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि नवोन्मेष क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र म्हणून उदयास येत आहे. या माध्यमातून कोरियन उद्योगांना सक्षम करण्यासाठी आणि नवीन सहकार्याच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे सांगितले.

स्वागत करताना कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये उद्योगाभिमुख शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री ४.० यांवर विशेष भर दिला जातो. कोसमे पुणे बेस कॅम्प हे कोरियन उद्योग आणि भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेमधील दुवा म्हणून कार्य करणार असून यामुळे उद्योग, रोजगार क्षेत्रासाठी नव्या संधींची दारे खुली होणार आहेत असे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.

स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी कोसमे आणि पीसीयू यांच्यातील सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या सामंजस्य करारापासून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, एमआयडीसी सोबतचे संवाद, पुण्यातील कोरियन उद्योगांशी झालेल्या चर्चा आणि नवी दिल्ली येथे झालेला करार याची माहिती दिली.

पीसीयूमध्ये आयोजित ‘कोरिया बिझनेस कल्चर प्रोग्राम’ या सहा आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थ्यांना कोरियन व्यावसायिक संस्कृती, कार्यपद्धती, उद्योग, अपेक्षा आणि जागतिक करिअरच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविक डॉ. रामदास बिरादार यांनी केले. सूत्र संचालन स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी केले. आभार डॉ. अनिल माहेश्वरी यांनी मानले.

——————————–

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपर्यावरण दिनानिमित्त दुर्गा देवी टेकडीवर वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन
Next Article ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण

June 29, 2026

अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

June 10, 2026

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार – मंत्री ॲड. आशिष

June 4, 2026

ज्येष्ठ नागरिक संघात रंगली सुरेल संगीत मैफिल

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?