गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामगीता देऊन सत्कार
अमरावती प्रतिनिधी / नितेश कानबाले,नांदगाव खंडेश्वर : येथील ऑक्टोपस कोचिंग क्लासेसचा यंदाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राजुरा येथील विद्यार्थिनी कु. रचना संदीप मोहोळ हिने सेमी इंग्रजी माध्यमातून ९५.२० टक्के गुण मिळवत चांदूर रेल्वे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रचना मोहोळ हिने आपल्या यशाचे श्रेय ऑक्टोपस कोचिंग क्लासेसचे संचालक प्रतिक संजयरावजी कोल्हे सर, सूर्यवंशी सर, कणसे सर, हर्षल रिठे सर तसेच आई व आजोबांना दिले. तिच्या यशामुळे राजुरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्लासमधील इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळवले. त्यामध्ये प्रेम टिके (८६.२०%), अंश नंदनवार (८३.२०%), सोनाली गजभिये (८२.६०%), वेदांत काळबांडे (८०.६०%), शर्वरी कैलकार (७९.८०%), आरुची बोंद्रे (७६.८०%), मंथन सुपटकर (७६.६०%), लकी टिके (७४.४०%) आणि हिमांशु फटे (७२.२०%) यांनी उल्लेखनीय गुण मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी क्लासमधील सर्व शिक्षकांचे आभार मानले. यावेळी संचालक प्रतिक कोल्हे सर, यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदनजी कन्नाके सर, किशोर सूर्यवंशी सर, प्रदीप कणसे सर आणि पत्रकार दिनेश जगताप यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांचा ग्रामगीता भेट देत सत्कार केला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
