पिंपरी चिंचवड : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या 2026-2027 या कार्यकाळासाठी अशोक गोरख खरात यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवार (दि. 17 मे 2026) रोजी सायंकाळी काळभोर नगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मावळत्या अध्यक्षा विणाताई सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक खरात यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
जयंती महोत्सव उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. जेवण व्यवस्था समिती प्रमुखपदी बिभीषण घोडके, बॅनर व्यवस्था समिती प्रमुखपदी गणेश खरात, सोशल मीडिया समिती प्रमुखपदी विठ्ठल देवकाते, व्यासपीठ व्यवस्था व विविध बैठका समिती प्रमुखपदी महावीर काळे सर, फटाके व आतिषबाजी समिती प्रमुखपदी अशोक खरात, कार्यक्रम समिती व पत्रिका-पत्रक व्यवस्था प्रमुखपदी राजाभाऊ दुर्गे, मिरवणूक व्यवस्था प्रमुखपदी अरुण पाडुळे, सत्कार मान-सन्मान समिती प्रमुखपदी आशाताई काळे, झेंडे व्यवस्थापन समिती प्रमुखपदी संजय नाईकवाडे, पुरस्कार्थी निवड समिती प्रमुखपदी संतोष पांढरे तसेच अहिल्यादेवी स्मारकाजवळील सत्कार समिती प्रमुखपदी रेखा दूधभाते यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस मावळत्या अध्यक्षा विनाताई सोनवलकर, नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक खरात, राजाभाऊ दुर्गे, धनंजय तानले, महावीर काळे, संतोष पांढरे, अरुण पाडुळे, आशा काळे, सोनाताई गडदे, रेखा दूधभाते, गणेश खरात, विठ्ठल देवकाते, नरेंद्र चऱ्हाटे, बिभीषण घोडके, सुरेश चौधरी, संजय नाईकवाडे, शंकर दातीर, हिराकांत गाडेकर, नवनाथ देवकाते आदी धनगर समाज बांधव, भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
