Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरीतील नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून पाहणी
पिंपरी चिंचवड

पिंपरीतील नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून पाहणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पावसाळ्यापूर्वी सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून दर १५ दिवसाला प्रकल्प अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

पिंपरी, दि. १८ मे २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत येणारी पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आदी कामे पुर्ण करण्यावर भर द्यावा. याशिवाय, प्रकल्पाच्या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यात यावा. तसेच आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी आज पिंपरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची तसेच डेअरी फार्म परिसरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ तसेच उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा तसेच डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पासंबंधित सर्व विभागांनी कामांमध्ये अधिक समन्वय ठेवून प्रकल्पांची गती वाढविणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नवीन प्रशासकीय इमारत हा महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यातील प्रशासन अधिक सक्षम करणारा प्रकल्प आहे. या इमारतीमुळे महापालिकेची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असून नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि सर्वसमावेशक आधुनिक सेवा उपलब्ध होतील. त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. तसेच डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. त्यामुळे या प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे.

याशिवाय, दोन्ही प्रकल्पाच्या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यात यावा. आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले.

यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर तसेच कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, आवश्यक तांत्रिक बाबी, प्रकल्पांची वैशिष्ट्ये, आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा प्रगती आढावा तसेच आगामी नियोजनाबाबतची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना सादर केली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे
Next Article शहरातील विकासकामे,अतिक्रमण नियंत्रण आणि नालेसफाई कामांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?