Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»महसूल विभागांतर्गत आता केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्र

महसूल विभागांतर्गत आता केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महाराजस्व अभियान राज्यस्तरीय समितीची बैठक

मुंबई, दि.१४ मे  : महसूल विभाग सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत सेवा देणारा विभाग असून अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तांची समिती नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्यात एक अभियान राबविण्याचे फ्रेमवर्क तयार करण्यात येईल आणि केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. सदस्य आमदार प्रसाद लाड, विक्रांत पाटील, योगेश टिळेकर, अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते. समितीचे अन्य सदस्य आमदार ऑनलाईन सहभागी झाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या सेवा गतीने मिळाव्यात यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’च्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. या अभियानामुळे महसूल विभागाबद्दल जनतेत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. आगामी काळात विधान परिषद सदस्यांच्या समन्वयाने हे अभियान अधिक व्यापक केले जाईल. आमदार विक्रांत पाटील यांची ‘राज्यस्तरीय समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते लोकसहभाग वाढवण्यासाठी ते काम पाहतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी विधान परिषद सदस्यांना जबाबदारी देऊन कामावर लक्ष ठेवले जाईल.

नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत असून जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे सुद्धा बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले. 300 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आणि रस्त्यांच्या प्रलंबित केसेस निकाली काढण्यासाठी विशेष अभियान राबवावे असे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी तीन महिन्यात सहा विभागांमध्ये राबविले जात असलेले हे अभियान महसूल विभागाच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण अभियान असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून विभागाच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. दुहेरी संवादामुळे तसेच महसूल विभागासह इतर विभागांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यामार्फत ‘सुराज्य ग्राम मुक्काम’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत तालुक्याचे अधिकारी आठवड्यातून एक दिवस गावात मुक्काम करतील. दिवसभरात तीन गावांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला जाईल. गावकऱ्यांच्या तक्रारींचे ‘डिजिटल ट्रॅकिंग’ पद्धतीने निवारण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानाचा अभ्यास करुन ते राज्यभर लागू करता येईल का याबाबत अभ्यास करण्याची सूचनाही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारत-श्रीलंका आर्थिक सहकार्याला नवी चालना
Next Article मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?