Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»उद्योग व्यापार»भारत-श्रीलंका आर्थिक सहकार्याला नवी चालना
उद्योग व्यापार

भारत-श्रीलंका आर्थिक सहकार्याला नवी चालना

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सिलोन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळासोबत संवाद बैठक

मुंबई, दि.१४ मे : मुंबई येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील सिलोन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळासोबत परस्पर संवाद बैठक पार पडली. उद्योजक, निर्यातदार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग प्रतिनिधी आणि व्यावसायिकांनी या बैठकीत सहभाग घेतला. 

मुंबई येथील श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत प्रियांगा विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेतील उद्योगक्षेत्र हे भारतीय उद्योगांबरोबर भागीदारी वाढविण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. लॉजिस्टिक्स, पर्यटन, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी श्रीलंकेतील १७ प्रमुख उद्योग समूहांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या श्रीलंका आर्थिक आणि गुंतवणूक परिषदेत भारतीय उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही विक्रमसिंघे यांनी केले.

मुंबई येथील ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या वरिष्ठ संचालक संगीता जैन यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

सिलोन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण बालेंद्र यांनी भारताच्या नजीकच्या भौगोलिक स्थानामुळे श्रीलंका हा प्रादेशिक व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगितले. बैठकीनंतर भारतीय आणि श्रीलंकन उद्योग प्रतिनिधींमध्ये सविस्तर चर्चा आणि नेटवर्किंग सत्र पार पडले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभंगार ई-लिलावाचा प्रस्ताव तहकूब
Next Article महसूल विभागांतर्गत आता केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?