विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
प्रतिनिधी संदीप शितोळे (बेल्हे,ता. जुन्नर)दिं.१५ मे : समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित आणि सीबीएसई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम राबविणाऱ्या समर्थ गुरुकुल, बेल्हे-बांगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी १४ व्या पामा इंडिया अबॅकस आणि मेंटल अरिदमॅटिक राष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.
शिर्डी येथे उत्साहात पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांत विजेतेपद पटकावले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री. सतीश कुऱ्हे यांनी दिली.
समर्थ गुरुकुलमध्ये पामा इंडिया संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अबॅकस प्रशिक्षण उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असून, त्यांच्या यशातून या उपक्रमाची परिणामकारकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
चॅम्पियन विजेते :पारस मोरे,स्मितल निमसे,स्वरा देशमाने.
प्रथम विजेते :स्वरा मते,शरण्या गुंजाळ,नूर आत्तार.
द्वितीय विजेते :मृण्मयी अल्हाट,हिंदवी आग्रे,हर्षद गुंजाळ,देवांश निमसे,आर्या देशमाने,आरोही आवटी,अर्णवी गाडगे.
तृतीय विजेते :ज्ञानेश्वरी डावखर,दूर्वा कणसे.
या सर्व विद्यार्थ्यांना अक्षरशिल्प पामा इंडिया यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सारिका काळे व वेदिका आरगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतरावजी शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेकभाऊ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, विश्वस्त सारिका ताई शेळके, समर्थ गुरुकुलच्या संचालिका सौ. स्नेहल ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर, पर्यवेक्षक हरिश्चंद्र नरसुडे, मातेले सर तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
