Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई
पिंपरी चिंचवड

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमणांविरोधात महापालिकेचा धडाका!

सिटी प्राईडमधील ६४१ चौ.मी. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; टॉवर लाइनवरील २५० मिळकतींवर कारवाई, तर भोसरीत २४ पत्राशेड हटविले

पिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि रस्ते-पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी महापालिकेच्या ‘अ’, ‘फ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शेकडो अतिक्रमणे हटवून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यात आले.

सिटी प्राईडमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील लोकमान्य टिळक रस्त्यावरील ‘सिटी प्राईड’ या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावरील अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामांवर महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली. संबंधित बांधकामधारकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. नोटिसांची मुदत संपल्यानंतरही बांधकामे स्वतःहून हटविण्यात न आल्याने महापालिकेने थेट कारवाई केली.

या मोहिमेत तब्बल ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड व बांधकामे हटविण्यात आली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता सुशीलकुमार लवटे, बिट निरीक्षक राहुल निकम, सुहास भगत यांच्यासह २० एमएसएफ जवान, नऊ मजूर आणि जेसीबी ब्रेकरचा वापर करण्यात आला.

टॉवर लाइन परिसरातील २५० मिळकतींवर कारवाई

दरम्यान, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १ (दक्षिण भाग, चिखली) आणि प्रभाग क्रमांक १२ (तळवडे) येथील टॉवर लाइन रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधातही मोठी मोहीम राबविण्यात आली.

अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील टॉवर लाइन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, दुकानांसमोरील वाढीव ओटे आणि धोकादायक पद्धतीने उभारलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. सुमारे १.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील २५० मिळकतींवर कारवाई करून तब्बल १६ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार आणि ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बिट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कारवाईसाठी २६ एमएसएफ जवान, पाच अतिक्रमण पोलीस, चार महापालिका मजूर, दहा कंत्राटी मजूर, तीन जेसीबी आणि एका ट्रॅक्टर ब्रेकरचा वापर करण्यात आला.

भोसरीत २४ पत्राशेड हटविले; फुटपाथ केले मोकळे

दुसरीकडे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने भोसरी परिसरातही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील संभाजीनगर, थर्मॅक्स चौक ते कस्तुरी मार्केट परिसरात एकूण २४ पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील कामगारनगर, पिंपरी परिसरातही पत्राशेड हटविण्याची कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासोबतच पादचाऱ्यांसाठीचे फुटपाथ मोकळे करण्यात आले. कारवाईत १४ एमएसएफ जवान, चार बिट निरीक्षक, चार महापालिका कर्मचारी, तीन वाहनचालक, दोन कॅमेरामन आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.

एकाच दिवशी तीन क्षेत्रीय कार्यालयांकडून झालेल्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईचा वेग वाढविल्याचे चित्र आहे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
Next Article संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

November 27, 2026

महापौर रवि लांडगे यांचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचे योगदान

November 27, 2026

दुर्गादेवी टेकडीच्या हरितसंपदेच्या रक्षणासाठी शर्मिला बाबर सरसावल्या!

November 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 20260

पिंपरी, प्रतिनिधी : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित ‘करवीर क्रीडास्पंदन २०२६’ या…

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

November 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?