Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
पिंपरी चिंचवड

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन; संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, प्रतिनिधी :- भारतीय संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता विनय ओहोळ, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बुकतर,तुकाराम गायकवाड, संतोष सुरवसे,सचिन खरात, पिंटू जामदार, गणेश पुंडा, वैभव भालेराव उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अमूल्य संविधानिक योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

उद्देशिका…..

“आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा; आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून उपस्थितांनी हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतःप्रत अर्पण करण्याचा संकल्प केला”

भारतीय संविधान दिन हा देशाच्या लोकशाही परंपरेचा, संविधानिक मूल्यांचा आणि नागरिकांच्या अधिकार व कर्तव्यांचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून महानगरपालिकेत संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, समानतेची भावना आणि सामाजिक न्यायाची संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी बोलताना लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या मूल्यांचे प्रत्येकाने केवळ स्मरण न करता ती अंगीकृत करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी, न्याय आणि सन्मान मिळावी आणि राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी संविधानाप्रती आपली जबाबदारी जपणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचे योगदान
Next Article एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

November 27, 2026

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

November 27, 2026

महापौर रवि लांडगे यांचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांचे योगदान

November 27, 2026

दुर्गादेवी टेकडीच्या हरितसंपदेच्या रक्षणासाठी शर्मिला बाबर सरसावल्या!

November 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमोल जाधवर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 27, 20260

पिंपरी, प्रतिनिधी : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित ‘करवीर क्रीडास्पंदन २०२६’ या…

२६/११ च्या हुतात्म्यांना अभियान प्रतिष्ठानतर्फे मानवंदना; शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन!

November 27, 2026

संविधानिक मूल्ये ही न्यायव्यवस्थेचा पाया असून भावी वकिलांनी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज! ….ॲड.शर्वरी सडोलीकर

November 27, 2026

एकाच दिवसात तीन क्षेत्रीय कार्यालयांत बुलडोझर कारवाई

November 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?