एनसीसी कॅडेट्सकडून शिस्तबद्ध मानवंदना; निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
पुणे प्रतिनिधी : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर हुतात्म्यांना तसेच दहशतवाद्यांशी लढताना अद्वितीय शौर्य गाजविणारे शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांना अभियान प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिरे हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने हुतात्म्यांना मानवंदना दिली. कमांडर नवनाथ मोडवे यांच्या हस्ते शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिलिंद भोई यांनी भूषविले.
यावेळी हिरे हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने हुतात्म्यांना मानवंदना दिली. कमांडर नवनाथ मोडवे यांच्या हस्ते शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिलिंद भोई यांनी भूषविले.
कार्यक्रमाला डीवायएसपी नंदकुमार सूर्यवंशी, माजी नगरसेवक विशाल तांबे, नितीन पंडित, तुषार काकडे, रवींद्र भोसले, बाळासाहेब आमराळे, शैलेश जगताप, हिरे हायस्कूलचे मुख्याध्यापक माने सर, संजय पासलकर, प्रा. तथा लेखिका दीपिका जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हिरे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना रुजावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाचे आयोजन अभियान प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार व कार्याध्यक्ष अजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वृषाली पाटील यांनी केले, तर रोहन पायगुडे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश वरे, आदेश बारवकर, अभि म्हसवडे, देवा सातवडे आणि विशाल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
