Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 26, 2026

संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे औंधमध्ये सामूहिक वाचन

November 26, 2026

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे औंधमध्ये सामूहिक वाचन
पुणे

संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे औंधमध्ये सामूहिक वाचन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे-गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानाचा जागर

पुणे/औंध प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या ७७ व्या संविधान दिनानिमित्त औंध येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या नवनियुक्त सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे-गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रथम महिला सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल इंद्रायणी करचे-गायकवाड यांचा पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रमेश ठोसर यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उपक्रमासाठी रमेश ठोसर यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिक आणि लहान मुलांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास औंध पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढूस, माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, ॲड. मधुकर मुसळे, सुनील उपाध्ये, अंगणवाडी सेविका निवेदिता वाघमारे, भारती कदम, युवा नेते अजय निरवणे, चंद्रकांत आव्हाड, निलेश ठोसर, सागर ससाणे, संतोष कांबळे, स्वप्नील पालके, प्रवीण ठोसर, निवृत्ती लांडगे, विनोद निरवणे, प्रशांत ठोसर, शुभम कांबळे, दिलीप गायकवाड, युवराज उबाळे आदींसह महिला आघाडीच्या सुरेखाताई परिहार, छायाताई ठोसर, हिराताई घोडेराव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधानातील मूल्यांचा जागर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देत औंधमधील संविधान दिन सोहळा उत्साहात पार पडला.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे
Next Article संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

न्यायालय परिसरही असुरक्षित? सात जणांच्या हल्ल्याने पुण्यात खळबळ!

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 26, 20260

पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच होत असलेल्या संविधान दौडला शहरवासियांनी,लोकप्रतिनिधींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा उत्तम…

संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे औंधमध्ये सामूहिक वाचन

November 26, 2026

निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका; ठेकेदाराचे बिल रोखावे

November 25, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?