Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»चिपळूण»श्री क्षेत्र परशुरामच्या विकासाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा!
चिपळूण

श्री क्षेत्र परशुरामच्या विकासाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्याकडून विकासकामांचा सविस्तर आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चिपळूण प्रतिनिधी : कोकणातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र परशुरामच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी पुढाकार घेतला आहे. भगवान श्री परशुराम मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रलंबित कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष ॲड. जीवन रेळेकर आणि विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रखडलेली कामे आणि परशुराम क्षेत्र विकास योजनेतील विविध प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय आढावा घेतला.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी जिंदाल यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामातील अडचणी आणि प्रलंबित बाबींची माहिती घेतली. विकासकामांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करून कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष ॲड. जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, संदीप थत्ते, सल्लागार रामचंद्र वडके व समीर देसाई, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पंकज गोसावी, माडकर व जाधव, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुखदेवे आणि चिपळूणचे उपअधीक्षक भूमी अभिलेख सुशांत साळुंखे आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र परशुराम हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आढावा आणि दिलेले निर्देश महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. प्रशासनाच्या समन्वयातून प्रलंबित विकासकामे मार्गी लागल्यास श्री क्षेत्र परशुरामच्या विकासाला निश्चितच नवी दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले
Next Article स्टेशन मास्टर्सच्या मागण्यांसाठी पुण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रोश!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?