Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»शंकर महाराज समाधी मठाचा अनधिकृत अन्नछत्र समितीशी संबंध नाही
पुणे

शंकर महाराज समाधी मठाचा अनधिकृत अन्नछत्र समितीशी संबंध नाही

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एफडीएच्या तपासणीत स्वयंपाकघर व प्रसाद वाटप व्यवस्थेत कोणतीही त्रुटी आढळली नाही; विश्वस्त मंडळाचे स्पष्टीकरण

पुणे, दि.१९ नोव्हेंबर २०२६ : श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी येथील प्रसाद वाटप व्यवस्था नियमितपणे सुरू असून, मठाच्या स्वयंपाकघराची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी आणि सचिव श्री. सतीश कोकाटे यांनी दिली.

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट (ए-७९३) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा रीतसर अधिकृत परवाना आहे. शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त एफडीए, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समाधी मठातील अद्ययावत स्वयंपाकघराची तसेच प्रसाद वाटप व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोणत्याही त्रुटी निदर्शनास आल्या नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले.

दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या या समाधी मठाच्या बाहेरील अनधिकृत **शंकर महाराज अन्नछत्र समिती** संदर्भातील आहेत. या समितीचा श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठाशी अथवा समाधी ट्रस्टशी कोणताही संबंध नाही, असे विश्वस्त मंडळाने जाहीर निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

संबंधित कारवाईच्या बातम्यांमुळे समाधी ट्रस्टबाबत भाविकांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये किंवा दिशाभूल होऊ नये, असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे. समाधी मठातील प्रसाद वाटपाची व्यवस्था नेहमीप्रमाणे नियमितपणे सुरू असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी, सचिव श्री. सतीश कोकाटे,तसेच विश्वस्त श्री. सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, श्री. निलेश मालपाणी आणि श्री. प्रताप भोसले  यांनी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिरगाव येथील श्री साईबाबा ट्रस्ट मधील भ्रष्टाचारी विश्वस्तांवर कारवाई करा – उस्मान शेख
Next Article ५ व्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर तर स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे यांची निवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026

दहीहंडीतील गोळीबार भोवला! आकाश कंचिले टोळीवर मकोक्याचा बडगा

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?