वाकड पोलिसांची दमदार कामगिरी; दोन चोरीचे गुन्हे उघडकीस, ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी……दसरा आणि अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांची गर्दी असलेल्या वाकड येथील पु. ना. गाडगीळ (PNG) ज्वेलर्समध्ये हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीसह दोन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर सायंकाळी ७.३३ वाजण्याच्या सुमारास भुमकर चौक, वाकड येथील PNG ज्वेलर्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २९.८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर याच ज्वेलर्समध्ये सायंकाळी ६.१९ वाजण्याच्या सुमारास अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ११.३७६ ग्रॅम वजनाचे शॉर्ट मंगळसूत्र चोरी करण्यात आले होते. या प्रकरणीही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या. पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह घटनास्थळापासून कोंढवा आणि केशवनगरपर्यंतच्या मार्गावरील सरकारी व खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सलग तपासणी केली.
या तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटली. त्यानंतर गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे लक्षात येताच आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली. आरोपी महाराष्ट्रात परतताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत धनराज विजय परमार (वय ४८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याला ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात निष्पन्न झालेली महिला आरोपी सुचित्रा किशोर साळुंखे (वय ७५, रा. शिंदेवस्ती, केशवनगर, पुणे) हिला १२ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींची पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली असता दोन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस उपनिरीक्षक मारणे यांच्यासह वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.री व खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सलग तपासणी केली.
या तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटली. त्यानंतर गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे लक्षात येताच आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली. आरोपी महाराष्ट्रात परतताच सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
