Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»किवळेमध्ये ज्येष्ठांची संगीतमय दिवाळी पहाट; जुन्या हिंदी-मराठी गीतांनी रंगली सुरेल मैफल!
पुणे

किवळेमध्ये ज्येष्ठांची संगीतमय दिवाळी पहाट; जुन्या हिंदी-मराठी गीतांनी रंगली सुरेल मैफल!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वरांजली संगीतमय ग्रुपचा बहारदार कार्यक्रम; ज्येष्ठांच्या गायनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे / किवळे, प्रतिनिधी : दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून किवळे विकासनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गायनकलेतून हिंदी आणि मराठी जुन्या-नव्या गीतांची सुरेल मैफल सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

संगीत दिग्दर्शक एम. डी. चौधरी आणि कार्यक्रमाचे निर्माते व संकल्पनाकार रवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेरी आवाज सुनो’ आणि ‘स्वरांजली संगीतमय ग्रुप’च्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सौ. सुरेखा वाघ, चंद्रकला रोकडे आणि सौ. रुक्मिणी वाघमारे यांच्यासह ज्येष्ठ गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नानासाहेब डोईफोडे आणि पंढरीनाथ सानप यांच्या हस्ते करण्यात आले. रवी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘गाये गणपती’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘देवाचे हे दारी’, ‘दिवानों से मत पूछो’, ‘तुमको मेरे दिल ने’, ‘फुलला रे क्षण माझे’, ‘इना मीना डिका’, ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’, ‘बेकरार करके’, ‘गार डोंगराची हवा’, ‘ज्योती कलश छलके’, ‘गोरी तेरा गाव’, ‘वादा करो साजना’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘ये रेशमी जुल्फें’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘आकाशी झेप घे रे’ आणि ‘मेरे झोपडी में राम आयेगा’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

विशेष आकर्षण ठरले ते रुक्मिणी वाघमारे यांनी सादर केलेले ‘रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग काय नातं’ आणि ‘कुंकू घ्या कुणी काळ मनी’ ही गीते. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली. तसेच एम. डी. चौधरी यांनी माऊथ ऑर्गनवर ‘सोलवा साल’ चित्रपटातील ‘ये अपना दिल तो आवारा’ ही धून वाजवून दिवाळी पहाटच्या मैफलीत वेगळीच रंगत आणली.

या संगीत मैफलीत गफूरभाई शेख, शिवदास मुळे, पृथ्वीराज आर्य, बापू देवरे, शिरीष राक्षे, सुरेखा ब्रह्मे, प्रतिभा भाले, विश्वास आंबेकर, राम खापरे, निखिल, अशोक गाढवे, पंढरीनाथ सानप, अलका हुके, हरिचंद्र, गोपीनाथ कुलकर्णी, बसवराज धोत्रे, अजय आमटे, वनिता नाफडे, सुप्रिया, विजय उपासने, किरण निकम आणि माटेश्वरी यांनी हिंदी-मराठी गीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य मारुती भराटे, इलियास खान, मच्छिंद्र कदम, माणिक हेकड, गफूरभाई शेख, दिलीप रोकडे, दशरथ वाघमारे, विश्वास आंबेकर, बसवराज धोत्रे, लक्ष्मण सुपे, ज्ञानोबा पाटोळे, सुरेखा ब्रह्मे, रवींद्र कदम आणि कल्पिता पळसुले यांनी विशेष सहकार्य केले.या प्रसंगी किवळे विकासनगरचे नगरसेवक निलेश तरस, राजेंद्र तरस, ऐश्वर्या राजेंद्र तरस, धर्मपाल तंतरपाळे आणि बापू कातळे उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांनी वयाचे बंधन बाजूला ठेवून आपल्या कलागुणांना दिलेली संगीताची सुंदर साथ, जुन्या आठवणींना उजाळा देणारी गीते आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे किवळे विकासनगरची दिवाळी पहाट अविस्मरणीय ठरली.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआरक्षणातील घुसखोरी रोखा, अतिवंचितांना न्याय द्या; SC उपवर्गीकरणासाठी गोरखे आक्रमक!
Next Article पिंपरी चिंचवडमध्ये ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 24, 20260

पिंपरी (प्रतिनिधी ).    : पुणेस्थित अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेड या विशेष वाहनांच्या तसेच बसच्या…

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?