Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका वाटपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आदेश
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका वाटपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आदेश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 12, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात मिळणार हक्काची घरे

पिंपरी, १२ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रस्तावानुसार, एकूण ९ पैकी ८ मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना मोफत सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये दिवंगत राहुल धोंडिबा गायकवाड यांच्या पत्नी अश्विनी राहुल गायकवाड, दिवंगत महेश सुरेश कुंभार यांच्या पत्नी शिवुबाई महेश कुंभार, दिवंगत अक्षय राजू सावंत यांच्या पत्नी हर्षदा सुरेश बने, दिवंगत वामन दगडू कसबे यांच्या पत्नी सुनीता वामन कसबे, दिवंगत सनी अशोक माने यांच्या पत्नी कांचन सनी माने, दिवंगत सुनील भारत कोरके यांच्या पत्नी पल्लवी सुनील कोरके, दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्या पत्नी मोहिनी भावेश वाणी, तर दिवंगत रणजित जयवंत पाटील यांच्या आई छाया जयवंत पाटील यांचा समावेश आहे.

तर दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना सदनिका वाटप करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याबाबत मा. महापालिका सभेने दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या ठरावानुसार मान्यता दिली होती. त्यानंतर तातडीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने मोफत सदनिका देण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. त्यानुसार आता पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात या आठ सदनिका उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुर्घटनेत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या कुटुंबांना निवाऱ्याचा कायमस्वरूपी आधार मिळणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षिततेचा आधार मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.

वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महापालिका सभेने केला होता. त्यानंतर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून त्याचे वाटपही करण्यात आले. आता मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असून, यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात यासाठी ८ सदनिकादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका संवेदनशील असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या वारसा कडून अद्याप कागदपत्र पूर्तता केली नाही. त्यामुळे सध्या ८ सदनिका वाटप आदेश करण्यात आले आहेत. या ८ सदनिका यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येईल. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे”

— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसेवानिवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील यांची ह्युमन राईट असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड
Next Article डीव्हीआर पळवला, पण पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत! १०८ घड्याळांसह दोघे जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?