Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या ७६ घटनांची नोंद; कोणतीही जीवितहानी नाही
पिंपरी चिंचवड

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या ७६ घटनांची नोंद; कोणतीही जीवितहानी नाही

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 9, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आगीवर नियंत्रणासाठी ४२ अग्निशमन वाहनांसह २५० अधिकारी-कर्मचारी तैनात; शहरभर नियमित गस्त

पिंपरी, दि. ९ नोव्हेंबर २०२६ : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी आगीच्या एकूण ७६ घटनांची नोंद झाली. यामध्ये २० फ्लॅट, घरे आणि दुकानांना आग लागल्याची, तर ५० ठिकाणी मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागल्याची व फ्लेक्स, कंपाउंड, वाहने आणि टॉवर यांना आग लागण्याच्या ६ घटनांची नोंद करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रत्येक घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सदर घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

विविध भागांतील ७६ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश

सदर घटनांमध्ये शहरातील विविध निवासी आणि व्यावसायिक भागांचा समावेश होता. ज्यामध्ये स्पाईन रोडवरील सेक्टर १२ येथील निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅट, जाधववाडी, चिखली येथील आठव्या मजल्यावरील फ्लॅट तसेच मोशी येथील मंत्रा मोमेंट सोसायटी परिसरातही आग लागल्याची घटना समोर आली.

तसेच मोरवाडी येथे चारचाकी वाहनाला, तर काळेवाडीतील बारणे कॉर्नर, थेरगाव येथे दोन दुचाकींना आग लागली. याशिवाय भोसरीतील लांडेवाडी, थरमॅक्स चौक-चिखली रोड, पिंपरी चौकातील गोकुळ हॉटेल परिसर, चिंचवड येथील एम्पायर इस्टेट परिसरातील नदीपात्र, मोई-निघोजे रोड, मोशी कब्रस्तान परिसर, निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव तसेच चिंतामणी चौक, चिंचवड चौक आणि चिंचोळे नगर परिसरातही आगीच्या घटना घडल्या.

नेहरूनगर येथील मयूर पॅनोरमा सोसायटी परिसरात गवताला, पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटी परिसरात नारळाच्या झाडाला, तर पिंपळे गुरव येथील भैरवनाथ नगर परिसरात कचऱ्याला आग लागली. या सर्व घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कार्यवाही करून आगीचा प्रसार रोखला.

अग्निशमन विभागाच्या पूर्वनियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली

दिवाळीच्या कालावधीत आगीच्या संभाव्य घटना लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. शहरातील नियमित १० अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त महत्त्वाच्या १२ ठिकाणी अग्निशमन वाहने आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले होते. यामुळे आगीची वर्दी मिळताच जवळच्या उपलब्ध पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले.

या विशेष नियोजनांतर्गत शहरात एकूण ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या या पूर्वतयारीमुळे तसेच जवानांच्या तत्पर प्रतिसादामुळे आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले आणि संभाव्य मोठ्या दुर्घटना टाळण्यात यश आले.

दरम्यान, नागरिकांनी निवासी इमारती, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने अग्निशमन विभागाच्या १०१ किंवा ७०३०१०८९९१ (मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १० अग्निशमन केंद्रांसह १२ महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविता आले आणि मोठी दुर्घटना टाळता आली. नागरिकांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“दिवाळीच्या कालावधीत आगीच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी अग्निशमन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरभर आग नियंत्रणाची कार्यवाही करण्यात आली. जवानांनी समन्वयाने आणि तत्परतेने कार्यवाही केल्यामुळे सर्व घटनांमध्ये जीवितहानी टाळणे शक्य झाले. नागरिकांनीही अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.”

– व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे सौदागरमध्ये आगीचा थरार! फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट; अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला!
Next Article पिंपरीत इंडिया आघाडी कडून नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?