Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपळे सौदागरमध्ये आगीचा थरार! फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट; अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला!
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये आगीचा थरार! फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट; अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अग्निशमन दलाची तत्परता; नागरिकांची सुखरूप सुटका, मोठी जीवितहानी टळली

पिंपरी, दि. ९ नोव्हेंबर : पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमधील ए-७०४ क्रमांकाच्या फ्लॅटला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केले असतानाच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, फ्लॅटच्या बाल्कनीतून आगीची सुरुवात झाली. काही वेळातच आग घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी, टीव्ही आणि अन्य घरगुती साहित्यापर्यंत पसरली. दरम्यान, घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.

घटनेची माहिती मिळताच रहाटणी उप अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन नेहरूनगर आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील पथकांनाही पाचारण करण्यात आले. जवानांनी होजरील व होजच्या साहाय्याने पाण्याचा जोरदार मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच सोसायटीतील नागरिकांची सुखरूप सुटका केली.

या आगीत एसी कॉम्प्रेसर, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरी, विद्युत वायरिंग आणि अन्य घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग पूर्णपणे विझविल्यानंतर अग्निशमन जवानांनी परिसराची पाहणी करून पुन्हा आग लागण्याचा कोणताही धोका नसल्याची खात्री केली.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे. गॅस गळतीचा संशय आल्यास विद्युत स्विच सुरू किंवा बंद करू नयेत, कोणतीही ठिणगी निर्माण होईल अशी कृती करू नये. गॅसचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करून दरवाजे व खिडक्या उघडाव्यात आणि तातडीने अग्निशमन विभागाशी १०१ किंवा ७०३०१०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआजोबांचा देशसेवेचा वारसा नातवाने जपला!
Next Article लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या ७६ घटनांची नोंद; कोणतीही जीवितहानी नाही
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?