Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये संभाव्य पाणीटंचाईचा धोका; प्रशासनाने आताच उपाययोजना कराव्यात!
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये संभाव्य पाणीटंचाईचा धोका; प्रशासनाने आताच उपाययोजना कराव्यात!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गळती रोखण्यासाठी फिरते पथक, वाहन धुणाऱ्यांना दंड आणि पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे शहरीकरण लक्षात घेता आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक स्थापन करणे, पिण्याच्या पाण्याने वाहने धुणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, नवीन मोठ्या बांधकामांतील पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे आणि विशेष पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करणे, अशा विविध उपाययोजना त्यांनी सुचवल्या आहेत.

शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ संकट उद्भवल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच पाण्याचे नियोजन, काटकसरीने वापर आणि उपलब्ध जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, असे भोईर यांनी म्हटले आहे.

पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक

शहरातील घरे, व्यावसायिक इमारती आणि कार्यालयांमधील नळ व पाइपलाइनची गळती रोखण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे. नागरिकांच्या मागणीनुसार नाममात्र शुल्कात किंवा मोफत गळती दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येईल, अशी सूचना त्यांनी केली आहे.

वाहन धुणाऱ्यांवर एक हजार रुपयांच्या दंडाची मागणी

पिण्याच्या पाण्याने कार, दुचाकी आणि इतर वाहने धुण्यास बंदी घालावी. त्याऐवजी ओल्या फडक्याचा वापर करण्याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. तसेच घरासमोरील अंगण, फरशी आणि पटांगण पाण्याने धुण्यावरही निर्बंध आणावेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच किमान एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात यावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

नवीन बांधकामांच्या पाणीवापरावर नियंत्रण

पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य टंचाईचा विचार करून नवीन मोठ्या बांधकामांमधील पाणीवापरावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसेच बोअरवेल यांचे सर्वेक्षण करून, लागू कायदेशीर तरतुदींनुसार त्यांच्या वापराचे नियोजन व समन्वय महापालिकेने करावा. उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून पाणीवाटपासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी सुचवले आहे.

पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी

शहरातील पाणीपुरवठा, उपलब्ध जलसाठे, गळती, पाण्याची मागणी आणि वितरण यावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी विशेष पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करावी. या समितीची दर १५ दिवसांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

पाणीबचतीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती

घरातील फ्लश टँकचा अनावश्यक वापर टाळणे, शॉवरऐवजी बादलीतील मोजक्या पाण्याने स्नान करणे आणि भांडी धुतल्यानंतरचे तुलनेने स्वच्छ वापरलेले पाणी झाडांसाठी किंवा बागेसाठी पुनर्वापरात आणणे, याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. त्याचबरोबर पाणीबचतीसाठी नागरिकांकडून व्यावहारिक सूचना मागवून त्यांचा नियोजनात समावेश करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

गरजूंसाठी झुणका-भाकर केंद्रे सुरू करा

संभाव्य टंचाईच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक आणि कष्टकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सेवाभावी संस्थांना आर्थिक व पायाभूत सहकार्य करावे. त्यांच्या माध्यमातून शहरात माफक दरात भोजन उपलब्ध करून देणारी झुणका-भाकर किंवा तत्सम अन्नछत्र केंद्रे सुरू करण्याचाही विचार करावा, अशी सूचना भोईर यांनी केली आहे.

“ही मागणी राजकीय विरोधासाठी नव्हे, तर सजग नागरिक म्हणून संभाव्य संकटाची जाणीव ठेवून केली आहे. पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा महापालिकेने आताच ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,”

……भाऊसाहेब सोपानराव भोईर, विरोधी पक्षनेते,पिंपरी चिंचवड.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशेतकऱ्यांना वाढीव मदत करा : प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे
Next Article वाय.सी.एम.मधील कथित भ्रष्टाचार उघड केला अन् जीवाला धोका? नगरसेवक संदीप वाघेरे यांचा गंभीर आरोप!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?