Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस
पिंपरी चिंचवड

काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी) :- सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटनांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस(दि.२३)असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि संविधानाची प्रास्ताविका पूर्ववत बसवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

या आंदोलनादरम्यान पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, संविधानप्रेमी नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटना एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामामुळे आंदोलनाला सुरुवात करण्यास विलंब झाला असला, तरी आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले असून मागण्या मान्य होईपर्यंत ते बेमुदत सुरू राहणार आहे.संविधान चौकात प्रास्ताविका पुन्हा बसवण्यात यावी, तसेच या प्रकरणात संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील लागू तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत. नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा.संविधानाच्या प्रास्ताविकेला हात लावण्याचा प्रकार लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना बाधा पोहोचवणारा असल्याचे सांगत, अशा प्रकारांना शहरात थारा दिला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

संविधान चौकातील प्रास्ताविकेचा शिलालेख नगरसेविका तृप्ती कांबळे आणि त्यांचे पती संतोष कांबळे यांनी हटवल्याचा आरोप केला. चौकाचे सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे संबंधितांकडून सांगितले जात असले, तरी त्यासाठी आवश्यक महानगरपालिकेच्या विभागीय परवानग्या, निधीची मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? महानगरपालिकेकडून या कामासाठी परवानगी किंवा आदेश देण्यात आलेच नव्हते. त्यामुळे या प्रकरणात केवळ संतोष कांबळे यांच्याविरोधात कारवाई करून चालणार नाही, तर नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.भारतीय संविधानाची प्रास्ताविका हा नागरिकांच्या अस्मितेचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा विषय असून चौकात पूर्वीप्रमाणेच प्रास्ताविका पुन्हा उभारण्यात यावी आणि सुशोभीकरणाचे काम नियमानुसार करण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. बी. शिंदे यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत संबंधित नगरसेविकेविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. संविधानाच्या आधारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीकडूनच संविधान चौकातील शिलालेख हटवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कृतीचा निषेध केला.या प्रकरणात नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्याऐवजी त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. संबंधित व्यक्तींवर त्यांच्या भूमिकेनुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तृप्ती कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संविधान चौकातील प्रास्ताविकेचा शिलालेख हटवण्याच्या प्रकरणावरून सांगवी परिसरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, काँग्रेससह विविध पुरोगामी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.संविधानाची प्रास्ताविका पूर्ववत बसवणे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे आणि जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करणे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते मानव कांबळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, आम आदमी पक्षाचे शशी बावनकर, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, बीबी शिंदे, अप्पा शिंदे, काँग्रेसचे हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, देवदत्त रानवडे, महिला नेत्या अनिता साळवे अनिता सोनवणे, विलास सकट, विजय उदमले, विजय ओव्हाळ आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपथनाट्यातून स्वच्छतेचा जागर….
Next Article सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला अखेरचा सलाम; कै. बाळकृष्ण वाघेरे यांचा दशक्रिया विधी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?