Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
पिंपरी चिंचवड

कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची गंभीर दखल

पिंपरी, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आल्याने महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबतचे निलंबन आदेश जारी केले असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.

डॉ. वैभव म्हस्के हे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी असून, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय सेवा ही रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी थेट संबंधित असल्याने या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने, सचोटीने आणि समर्पित भावनेने पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, डॉ. म्हस्के हे दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याची बाब रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.

या प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अभिप्राययुक्त अहवाल आणि महापालिका आयुक्तांची मान्यता विचारात घेऊन प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यावर असताना मद्याच्या प्रभावाखाली राहणे आणि त्यामुळे कर्तव्यपालनावर परिणाम होणे हे शासकीय सेवकांसाठी निर्धारित आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ आणि नियम २८ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) यांचा भंग झाल्याचा निष्कर्ष निलंबन आदेशात नोंदविण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) मधील तरतुदींनुसार डॉ. म्हस्के यांना आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ नुसार त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विभागीय चौकशीच्या अनुषंगाने संबंधित रुग्णालय प्रशासनाला आदेशाची अंमलबजावणी करून त्याची पोहोच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

निलंबन कालावधीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, त्यासाठी विहित अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीत त्यांना अन्य कोणत्याही ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. निर्वाह भत्ता मिळविण्यासाठी अन्यत्र सेवा, नोकरी अथवा व्यवसाय केला नसल्याचा स्वाक्षरीयुक्त दाखला दरमहा २० तारखेच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच, निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पिंपरी येथे राहणार असून, वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणी लागू असलेल्या सेवा नियमांनुसार कारवाई सुरू केली असून, विभागीय चौकशीच्या माध्यमातून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article” शहरातील विविध साहित्य संस्थांच्या वतीने शिवाजीराव शिर्के यांना आदरांजली”
Next Article रस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?