Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

October 6, 2026

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण

October 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच
पिंपरी चिंचवड

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या ‘भूमिके’ने भारावून गेले तर ‘फॅमिली’च्या हास्यविनोदाने खळखळून हसले प्रेक्षक

पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : अभिजात मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा नागरिकांसमोर आणण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि सायंकाळच्या सत्रात क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या दोन वैविध्यपूर्ण नाटकांचे सादरीकरण झाले. हास्यविनोदापासून सामाजिक आणि वैचारिक आशयापर्यंत मराठी रंगभूमीचे विविध पैलू या दोन्ही नाटकांतून रसिकांना अनुभवता आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीशी नागरिकांचा संवाद अधिक दृढ व्हावा, यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सत्रात सादर झालेल्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या संतोष पवार लिखित व दिग्दर्शित नाटकातून दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाच्या गडबडीतून निर्माण होणारा विनोद रंगमंचावर खुलला. पात्रांच्या वेगवेगळ्या शारीरिक अडचणी आणि वैशिष्ट्यांमधून निर्माण होणारे गैरसमज, प्रसंग आणि संवाद यामुळे नाटकाला धमाल विनोदाची रंगत लाभली. कुटुंबातील व्यक्तींच्या उणिवा स्वीकारत त्यांच्यातील प्रेम आणि आपलेपणा जपण्याचा संदेश देत या नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

यानंतर सादर झालेल्या ‘भूमिका’ या गाजलेल्या नाटकाने रंगमंचाला गंभीर आणि वैचारिक वळण दिले. क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. एका अभिनेत्याला साकाराव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या माध्यमातून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात, विचारांमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये होणारा बदल या नाटकातून मांडण्यात आला आहे.

‘भूमिका’ हे केवळ रंगमंचावरची व्यक्तिरेखा साकारण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रती आणि स्वतःच्या मूल्यांप्रती असलेली भूमिका काय असावी, याचा विचार करण्यास भाग पाडणारे नाटक आहे. सामाजिक समता, अस्मिता, संविधानिक मूल्ये आणि मानवी नातेसंबंध यांसारख्या विषयांना वैयक्तिक आणि कौटुंबिक संघर्षाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याने नाटकाला वैचारिक खोली प्राप्त झाली. सचिन खेडेकर यांच्यासह कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला आणि नाटकाच्या आशयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दुपारच्या सत्रातील विनोदी रंगत आणि सायंकाळच्या सत्रातील गंभीर वैचारिक मांडणी अशा दोन्ही भिन्न अनुभवांनी आजचा दिवस मराठी रंगभूमीच्या विविधतेचा परिचय करून देणारा ठरला. दोन्ही नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षागृहात नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. हास्य, मनोरंजन, सामाजिक भान आणि वैचारिक चिंतन यांचा अनुभव देणाऱ्या या दोन्ही नाटकांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रात्रीच्या सत्रात ‘सणयात्रा’तून उलगडला मराठी सण-परंपरेचा सांस्कृतिक प्रवास

लोकजागर ऍक्टिव्हिटीजच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘सणयात्रा’ या कार्यक्रमातून मराठी पंचांगानुसार येणाऱ्या विविध सणांची वैशिष्ट्ये, त्यामागील परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा रसिकांसमोर उलगडण्यात आल्या. महाराष्ट्राच्या समृद्ध सणपरंपरेचा सांस्कृतिक वारसा सांगत, प्रत्येक सणाशी संबंधित परंपरा आणि त्यामागील कथांना नृत्य व संगीताची सुरेल साथ देण्यात आली. माहिती, परंपरा, नृत्य आणि संगीत यांची सांगड घालत सादर झालेल्या या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीतील सणांचे विविध रंग आणि त्यामागची सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026

मराठीच्या अभिजाततेला व्यवहाराच्या भाषेचे बळ देणे हीच खरी जबाबदारी

October 5, 2026

‘फोक महाराष्ट्र’मधून लोकसंस्कृतीचा जागर; मराठी अस्मितेचा सुरेल आविष्कार

October 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 6, 20260

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या ‘भूमिके’ने भारावून गेले तर ‘फॅमिली’च्या हास्यविनोदाने खळखळून हसले प्रेक्षक पिंपरी, दि.…

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

October 6, 2026

उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून अपहरण

October 6, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘लोकशाही बचाव मार्च’

October 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?