Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अन्नामृत फाउंडेशनच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन; सुमारे ३०० शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक आहार

पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आज उद्घाटन करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३०० शाळांमधील तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषणमूल्ये यांचा विचार करून केंद्रीय स्वयंपाकगृह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत करण्यात आले आहे. आहार तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार मिळणे हीदेखील आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असून, या व्यवस्थेमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखणे आवश्यक आहे. आधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आलेले हे केंद्रीय स्वयंपाकगृह त्यादृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.”

 “विद्यार्थ्यांना मिळणारा प्रत्येक घास हा सुरक्षित, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण असावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातही विद्यार्थीकेंद्री उपक्रमांना प्राधान्य देत महानगरपालिकेच्या माध्यमातून शैक्षणिक व पोषणविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.”

……. रवी लांडगे. महापौर पिंपरी चिंचवड 

आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य

या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तथा आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी आधुनिक व अधिक सक्षम व्यवस्था उभारण्यास मदत झाली. महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे काम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक पोषण मिळण्यामध्ये या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे केवळ आहाराचे वितरण न करता त्याची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पौष्टिकता सातत्याने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याच उद्देशातून केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.

या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरु गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह अन्नामृत फाउंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहामुळे मोठ्या प्रमाणावर पोषण आहार तयार करण्याची क्षमता, स्वच्छता व अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत गुणवत्तापूर्ण आहार पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण व उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरस्ते-गटार सफाई निविदेवर ‘रिंग’चा संशय; संदीप वाघेरे आक्रमक!
Next Article अश्लील डीजे डान्स मुक्त पुणे या आमच्या प्रयत्नांना अखेरीस यश- टिना शर्मा घेवारे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?