Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»‘अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा
मुंबई

‘अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे अमृत महोत्सवी संगीत कलाकारांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम

मुंबई, दि. २ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा सन्मान तसेच त्यांनी गायलेल्या, स्वरबद्ध केलेल्या आणि संगीत संयोजन केलेल्या गीतांचा व नृत्याचा विशेष स्वरसोहळा ‘अमृताहुनी गोड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कलाकृतींचे स्मरण करणे आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाचा नव्या पिढीशी परिचय करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अजित कडकडे, डॉ. मंजिरी देव आणि अप्पा वढावकर यांचा सन्मानार्थी व विशेष सहभागी म्हणून सहभाग असणार आहे. त्यांच्या कलाप्रवासाला उजाळा देत त्यांच्या गायन, स्वररचना आणि संगीताशी संबंधित निवडक कलाकृतींचे सादरीकरण या स्वरसोहळ्यात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि ओंकार प्रभूघाटे हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत. विघ्नेश जोशी निवेदन करणार असून, सागर साठे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच डॉ. मंजिरी देव यांच्या शिष्यांचे नृत्य सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व ज्येष्ठतम कलावंतांच्या योगदानाचा गौरव करणे, त्यांच्या कलासाधनेचा वारसा जतन करणे आणि तो रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. शिल्लक प्रवेशिका रविवार, ६ सप्टेंबर २०२६ पासून नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमातील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीत मान्यवरांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाला समर्पित ‘अमृताहुनी गोड’ या विशेष स्वरसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय कार्याबद्दल सोनाराम बिश्नोई यांचा सन्मान
Next Article औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी वैयक्तिक आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?