Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान
मुंबई

महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 20, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘उमरडा’ गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई, दि. २० ऑगस्ट: महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर ‘माडग्याळ’ प्रजातीच्या मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील उमरडा या स्थानिक गोवंशाचे व माडग्याळ या मेंढी प्रजातीचे संवर्धन, जतन व आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) या संस्थेला पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या’ (आयसीएआर) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) चे संचालक डॉ. एन.एच. मोहन यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या ‘आयसीएआर ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी’च्या १४ व्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा आणि संशोधनात पुण्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ’, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर तसेच कर्नाटक येथील कृषी व पशुवैद्यकीय विद्यापीठातील तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.

पारंपरिक पशुधनाच्या संवर्धनाला संस्थात्मक आणि शास्त्रीय बळ – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्राच्या मातीत विकसित झालेल्या उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून आणि माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून मिळालेली राष्ट्रीय मान्यता ही राज्यातील पशुपालकांसाठी अभिमानाची बाब आहे. या मान्यतेमुळे आपल्या पारंपरिक पशुधनाच्या संवर्धनाला संस्थात्मक आणि शास्त्रीय बळ मिळणार असून, भविष्यात पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. राज्यातील स्थानिक गोवंश व मेंढी प्रजातींचे जतन करतानाच त्यांची उत्पादकता आणि आनुवंशिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल. महाराष्ट्राच्या पशुधनाची ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख देशाच्या पशुधन क्षेत्रात अधिक ठळकपणे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यासाठी आता अधिक व्यापक संधी उपलब्ध…….. डॉ. रामास्वामी एन.

उमरडा गोवंश आणि माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र अधिकृत ब्रीड म्हणून मिळालेली मान्यता ही महाराष्ट्राच्या पशुधन संपदेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची उपलब्धी आहे. या दोन्ही स्थानिक प्रजातींची वैशिष्ट्ये, आनुवंशिक क्षमता आणि स्थानिक परिस्थितीशी असलेली अनुकूलता यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यासाठी आता अधिक व्यापक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पशुपालक, संशोधक, विद्यापीठे आणि संबंधित संस्थांच्या समन्वयातून या प्रजातींचे जतन, संवर्धन आणि आनुवंशिक सुधारणा यांना अधिक गती देण्यात येईल. महाराष्ट्राच्या स्थानिक पशुधनाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील, असे पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.यांनी सांगितले.

स्थानिक पशुपालकांना होणार फायदा ………… डॉ. किरण पाटील

राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाल्यामुळे आता उमरडा या गोवंशाच्या व माडग्याळ या मेंढी प्रजातीच्या जतन, संवर्धन व सुधारित प्रजननासाठी सरकारी स्तरावर विशेष योजना व निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे स्थानिक पशुपालकांना मोठा फायदा होईल. महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, पुणे व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर तसेच संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रदीर्घ अभ्यास व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय स्तरावर अधिकृत नोंदणी मिळाल्यामुळे या प्रजातींच्या शास्त्रीय जतन, प्रजनन सुधारणा व गुणवत्ता वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विशेष योजना राबवणे आता अधिक सोपे होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास व ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मोठी मदत होईल, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले

उमरडा गोवंशाविषयी….

अमरावती जिल्ह्याचे ब्रिटिशकालीन गॅझेटमधील (१९१०) नोंदीवरून उमरडा गोवंश गेल्या शतकापासून आपले अस्तित्व राखून असल्याचे सिद्ध होत आहे. बंजारा समाजाव्यतिरिक्त स्थानिक पशुपालकांकडून देखील उमरडा गोवंशाचा सांभाळ केला जात आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा व लगतच्या अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात अंगकाठीने उंचपुरी, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या गोधनाचा सांभाळ बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने होत असून त्यांना उमरडा गोवंश म्हणून ओळखले जाते.

वाशीम जिल्ह्यातील ‘उंबर्डा बाजार’ या पशुधन बाजारपेठेवरून ‘उमरडा’ हे नाव स्थानिक गोवंशाला प्राप्त झालेले असून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यावरून या गोवंशाला ‘दिग्रस’ किंवा बंजारा समाजावरून ‘बंजारा गोवंश’ म्हणून देखील संबोधले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, आर्णी तालुके, वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा (लाड) हे तालुके आणि अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात मोठ्या संख्येने उमरडा गोवंश आढळून येतो.

माडग्याळ मेंढी प्रजातीविषयी…

मुख्यतः धनगर आणि रामोशी समाजातील मेंढपाळ/शेतकरी या मेंढ्या पाळतात. मेंढ्यांचे कळप स्थलांतरित आहेत. विषम हवामानात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, उत्तम रोग प्रतिकारशक्ती, जलद वजन वाढवण्याची क्षमता, कोकरू जगण्याची अधिक क्षमता, मातृत्वाची चांगली प्रवृत्ती आणि चांगला कळप आणि मटण उत्पादनासाठी फायदेशीर अशा गुणवैशिष्ट्यांमुळे माडग्याळ मेंढ्या दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत.

मेंढपाळांच्या मते माडग्याळ मेंढीची उत्पत्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील माडग्याळ आणि सनमाडी गावात स्थानिक मेंढीपालकांनी निवड पैदास पद्धतीने केली आहे. माडग्याळ मेंढ्या झपाट्याने वजन वाढवण्याची क्षमता दर्शवतात. माडग्याळ ही महाराष्ट्रातील मोठ्या आकाराची आणि मटणासाठी विशेष लोकप्रिय मेंढी आहे. प्रामुख्याने पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके आढळतात तर काही मेंढ्या तपकिरी देखील दिसतात.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘आयपीएसओडब्ल्यूए’च्या पाठबळामुळे महिला बचत गटांना बाजारपेठेची संधी
Next Article शहरातील प्रलंबित समस्यांना बगल देत सत्ताधारी व विरोधकांचा ‘वंदे मातरम्‌’वरून गोंधळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?