Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»इंग्लंड मध्ये भारताच्या फाळणीचे बीजे रोवली गेली – डॉ. हेमदेव थापर
पिंपरी चिंचवड

इंग्लंड मध्ये भारताच्या फाळणीचे बीजे रोवली गेली – डॉ. हेमदेव थापर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड शहरात ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त विशेष सभा संपन्न; कलम ३७० रद्द केल्यामुळे पंडित नेहरूंच्या निर्णयाला मिळाला पूर्ण विराम

पिंपरी-चिंचवड :- शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत ‘विभाजन विभीर्षिका दिन’निमित्त एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळल्या गेलेल्या या सभेसाठी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. हेमदेव थापर उपस्थित होते.

या सभेला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, हर घर तिरंगा अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, हर घर तिरंगा अभियानाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, गटनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिन तापकीर, प्रवक्ते राजु दुर्गे अजित कुलथे, मंडलाध्यक्ष मोहन राऊत, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, धरम वाघमारे, मनिष पंजाबी, कुणाल साठे, ऋषिकेश वाघेरे, गणेश ढाकणे, कैलास सानप, नंदू भोगले, सचिन राऊत, महेश मोटवानी, सुरेश हेमनानी, गोपाल केसवानी, हिरालाल रिझवानी, हेमंत राजस्थ, यशवंत भोसले, उषा वाघेरे, अनिता वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, रवींद्र देशपांडे, बिभीषण चौधरी, संजय पटनी, आरती चोंधे, संतोष तापकीर, मदन गोयल, मामा मारणे, सुधीर कुदळे, ओमप्रकाश शर्मा, रवींद्र नांदूरकर, खंडूदेव कठारे, सत्यपाल गोयल, संतोष ओझा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चाचे संयोजन ऍड. नानिक पंजाबी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, ज्योतीका मलकानी, आतम प्रकाश मताई यांनी केले. तसेच सिंधी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

  “१९३० साली इंग्लंडमध्ये एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत चर्चा करताना एका मुस्लिम नेत्याने भारताला स्वातंत्र्य द्यायचे झाल्यास मुस्लिम समाजासाठी वेगळा देश देण्यात यावा, अशी मागणी केली आणि तेव्हापासूनच फाळणीची चर्चा सुरू झाली. पुढे १९३७ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली आणि त्या संघटनेने वेगळ्या देशाचे नाव ‘पाकिस्तान’ असावे, असा संदेश मुस्लिम समाजात पसरवण्याचा प्रयत्न केला. १९४७ साली बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला आणि या संधीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार सुरू करण्यात आले. अखेर १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री देशाची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश जगाच्या नकाशावर आले.”

…… डॉ. हेमदेवजी थापर.

पुढे बोलताना डॉ. थापर म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील लहान-लहान संस्थाने विलीन करून घेण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली गेली आणि त्यांनी ५४२ संस्थाने विलीन करून घेतली. मात्र, उरलेल्या काही संस्थानांपैकी काश्मीर संस्थान विलीन न करता तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर संस्थानाला वेगळा पंतप्रधान, वेगळे निशाण आणि वेगळे संविधान करण्याची परवानगी दिली. आता आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मूळ मागणीनुसार, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संविधानातील कलम ३७० रद्द करून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या वेळच्या निर्णयाला पूर्ण विराम दिला आहे आणि आज काश्मीर प्रांत भारताचे पूर्ण अधिकारसंपन्न घटक राज्य म्हणून ओळखला जात आहे.

या सभेचे प्रास्ताविक आयोजक ऍड. नानिक पंजाबी यांनी केले. सूत्रसंचालन भाजप संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर आभार सिंधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी मानले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘खासदार सेवा आपल्या दारी’ उपक्रमात लोहगावकरांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या
Next Article नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?