Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
पिंपरी चिंचवड

स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनास उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले

पिंपरी-चिंचवड, दि.१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती परिसरात आयोजित विविध देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. Youvan संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन तसेच महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा स्वर — ‘वंदे मातरम्’

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जागविणारे प्रेरणागीत ठरले. स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांवर या गीताने देशवासीयांना एकत्र आणत मातृभूमीप्रती समर्पणाची भावना दृढ केली. या ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व कर्तव्यभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक स्वर भक्ती-शक्ती परिसरात घुमले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापौर लांडगे यांनी YOUVAN संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित

याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात विविध कलाकारांनी राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. महापालिकेतील प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच संगीत आणि गायनाची आवड जोपासणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल महापौर लांडगे यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात बालकलाकार ‘वंडर बॉय’ पृथ्वीराज सतीश इंगळे याने ‘मेरा जूता है जापानी’ हे गीत सादर केले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर लांडगे यांनी पृथ्वीराजचे विशेष कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासाची जबाबदारीही रुजली पाहिजे”

“स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांतून राष्ट्रप्रेम, एकात्मता आणि मातृभूमीप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित होते. नव्या पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमासोबत राष्ट्रविकासातील आपली जबाबदारीही दृढ व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य पंकज भालेकर, अतिश बारणे, जनता व संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह Youvan संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, कलाकार, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या दोन्ही उपक्रमांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि नव्या पिढीचा सहभाग यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
Next Article ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रविकासाची शपथ!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?