Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी स्वतःहून पाहणी करून सक्रियपणे कार्यवाही करण्याचे निर्देश

पिंपरी, प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते व सार्वजनिक सुविधांची सुरक्षितता आणि देखभाल यांना प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते व कनिष्ठ अभियंते यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक बाबींची स्वतःहून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. खड्डे बुजविताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रस्त्यांसोबतच सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीला प्राधान्य

रस्त्यांबरोबरच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा आणि आवश्यक कामांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय जबाबदारी निश्चित; दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई

प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालय व वॉर्डमधील कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची तपासणी यावर लक्ष द्यावे.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. सोपविण्यात आलेल्या क्षेत्रातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामांचा दररोज घेतला जाणार आढावा

दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा. खड्डे दुरुस्ती तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुरुस्तीची कामे वेळेत, दर्जेदार आणि समन्वयाने पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर सहकार्याने कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

“नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारची प्रतीक्षा न करता आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीची नियमित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. या सर्व कामांचा दररोज आढावा घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने स्वागत
Next Article अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?