Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 3, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दिनांक ०३ ऑगस्ट: शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे शालेय शिक्षण महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी शालेय अभ्यासक्रमात नशामुक्ती च्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पीजीआय २.० मध्ये देशात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. राज्यात पीएम श्री शाळांसह सर्व शाळांमधून चांगले शिक्षण दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय आधार प्रमाणीकरण, आरटीइद्वारे ३५ लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ, पवित्र पोर्टल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, यासह विविध शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली.

राज्य शासनाने शाळांमध्ये नशाविरोधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा आणि ‘ड्रग-फ्री स्कूल’ अभियान राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमधील सुरक्षा, सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी व कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २८ : १

देशातील एकूण शाळांपैकी ९.३४ टक्के, शिक्षकांपैकी ८.८४ टक्के आणि विद्यार्थ्यांपैकी ७.६९ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यातील १,०८,०६५ एकूण शाळा मध्ये २,२०,४८,४४३ विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २८ : १ आहे

राज्यातील शाळांमध्ये ६४,३४१ शासकीय, २९,४८६ खासगी अनुदानित आणि उर्वरित स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्रीय शाळा आहेत. शालेय शिक्षण व्यवस्थेचा विस्तार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य शासन विविध स्तरांवर सुधारणा राबवत आहे. निपुण महाराष्ट्र अभियान, राष्ट्र प्रथम अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव सारखे कार्यक्रम याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.

यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी शाळांमध्ये नशामुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे सांगितले.

शिक्षकांसाठी एआयसाथीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण देखील राबविण्यात आले आहे. शिक्षकांचे अभ्यास दौरे, चांगले काम करणाऱ्या शिक्षण समित्या व शिक्षकांच्या सहभागाने उपक्रमांना चालना, दत्तक शाळा, सीएसआर-सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवीन विचार देखील सुरू झाला आहे. यातूनच शासकीय शाळांमध्ये सुपर १०० योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवान शंभर विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षांचे स्पर्धात्मक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी निवड केली जाईल.

राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला केंद्र सरकारच्या वतीने एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात विस्तृत स्थान देण्यात आले आहे. अभ्यासक्रमात याचा अधिक व्यापक समावेश करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यासोबतच राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या (एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी) शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे व मराठी विषयाची परीक्षा घेणे सक्तीचे केले आहे, याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय -मंत्री संजय शिरसाट
Next Article नागरिकाभिमुख विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर -राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?