Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी चिंचवड

थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :– भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, ‘प्रती सरकार’चे शिल्पकार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे,उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. ब्रिटिश सत्तेविरोधात निर्भयपणे उभे राहत त्यांनी जनतेच्या सहभागातून ‘प्रती सरकार’ची स्थापना करून स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजघटकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी अध्याय म्हणून ओळखला जातो.

राष्ट्रप्रेम, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि जनकल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर समाजहितासाठी कार्य केले. त्याग, संघर्ष आणि निःस्वार्थ समाजसेवेचा त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांतून राष्ट्रसेवा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान क्रांतिकारकाचे कार्य, विचार आणि राष्ट्रसेवेचा वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजहित, लोककल्याण आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य अतिधोकादायक इमारती व अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा….आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
Next Article “आजचे नियोजन म्हणजे उद्याचे सुंदर शहर”; प्रारूप विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला वेग :- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?