Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य अतिधोकादायक इमारती व अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा….आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य अतिधोकादायक इमारती व अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा….आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट : शहरातील अतिक्रमण, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, हॉकर्स व्यवस्थापन, बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा तसेच विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रम बगाडे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर ,शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, प्रेरणा सिंदकर, सुनिल भागवानी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

शहरात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. विशेषतः अतिधोकादायक इमारतींच्या संदर्भात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी अशा इमारतींच्या मिळकतधारकांना तात्काळ नोटिसा बजावून इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच आवश्यक ती पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याचबरोबर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. हॉकर्स व्यवस्थापनाबाबत नियमानुसार कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई, बांधकाम परवानग्यांची नियमित पडताळणी, पाणीपुरवठा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन तसेच विविध विकास प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

त्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये नाल्यांचा मूळ प्रवाह बाधित होणार नाही आणि त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याचवेळी कार्यवाही करावी. बांधकाम परवानगी, अग्निशमन परवानगी अशा विविध परवानग्या देण्याबाबतदेखील प्रशासकीय यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

नागरिकांना कचरा विलगीकरण मोहिमेमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांना याबाबत अवगत करावे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात न्यायालयाचे आदेशही नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचातुर्मास कीर्तन महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात
Next Article थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?