Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कागदपत्रांच्या त्रासाला पूर्णविराम ; नागरिकांसाठी भव्य समाधान शिबिर
पिंपरी चिंचवड

कागदपत्रांच्या त्रासाला पूर्णविराम ; नागरिकांसाठी भव्य समाधान शिबिर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्या १ ऑगस्टला पिंपरी चिंचवड मध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा उपक्रम

 पिंपरी विशेष प्रतिनिधी ……सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही अनेकदा सामान्य नागरिकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित राहतात. दाखले, प्रमाणपत्रे, मतदार यादीतील दुरुस्ती, आधार, रेशन कार्ड, पेन्शन, आयुष्मान भारत कार्ड अशा असंख्य कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे समाधान शिबिर” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खंडोबा मंदिर सभागृह, खंडोबा माळ, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड येथे हे शिबिर होणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या शिबिरात उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर, ज्येष्ठ नागरिक, आधार दुरुस्ती, मतदान यादीतील नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती, ऑनलाइन सातबारा, फेरफार उतारा, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी व श्रावणबाळ योजनांसह अनेक महसुली आणि सामाजिक योजनांशी संबंधित सेवा उपलब्ध असणार आहेत. तसेच महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया याच ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेशी संबंधित पात्र लाभार्थींनाही आवश्यक कागदपत्रांसह मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शिबिरात सहकार विभागाशी संबंधित हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न, महावितरणच्या तक्रारी, तसेच विविध शासकीय योजनांबाबत तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. विधवा महिला, अत्याचारित परित्यक्ता महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व बालकल्याण योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी ती सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या समाधान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि तज्ज्ञ एकाच ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या वाचणार आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांच्या दारात सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुसळधार पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना; अग्निशमन विभागाची तात्काळ कार्यवाही
Next Article साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?