Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ
पिंपरी चिंचवड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 1, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन; सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ या कार्यक्रमाचा आज भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा समाजापर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अ प्रभाग अध्यक्षा अर्चना करांडे, नगरसदस्य अनिल घोलप,अनुराधा गोरखे, सुलभा उबाळे, सुप्रिया चांदगुडे, ऐश्वर्या तरस, निलेश तरस, मधुरा शिंदे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी देवस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदंडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संजय ससाणे, अरुण जोगदंड,युवराज दाखले,नितीन घोलप, प्रल्हाद सुधारे,सुनिल भिसे,रोहन भिसे,नाना कसबे,सतीश भवाळ,यादव खिलारे,विशाल कसबे,बाळासाहेब रसाळ,शिवाजी साळवे, डी.पी.खंडाळे, नेताजी शिंदे,नामदेवराव रिट्टे,भगवान शिंदे, पोपट आरणे, मारुती जाधव, नरसिंह वैरागर, सुरेश वैरागर, प्रसाद केसरे, अर्चना शिंदे, सुनिता भेंगळे, समिरा राजगुरू, अनिता जगधनेमहिला अध्यक्षा उषाताई कांबळे, कल्पना मोरे-दाखले,अनिशा पवार, संगिता नानेकर, गीता अडागळे, आशा शहाणे, मीना खिलारे, संदीप रोखडे, गणपत जाधव, अरुणा भोसले, तेजस्विनी भोसले, किर्ती जाधव, वंदना जाधव, सचिन लिमकर, विलास गडसिंग, संतोष जाधव, अनंत कुलकर्णी, सतीश रिट्टे तसेच विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयोजित या महोत्सवात सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने, वैचारिक परिसंवाद, साहित्यिक कार्यक्रम, कवी संमेलन, लोककला सादरीकरणे, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनईवादन, पारंपरिक हलगीवादन, बँड स्पर्धा,स्वरचंदन’ गीतगायन, ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सात दिवसांच्या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि लोककलावंत सहभागी होणार असून, सामाजिक प्रबोधनासोबतच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत त्यांचा वैचारिक वारसा पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि लोकसहभाग अधिक दृढ होईल. नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा संदेश समाजात अधिक व्यापक करावा.”

-आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड मनपा

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकागदपत्रांच्या त्रासाला पूर्णविराम ; नागरिकांसाठी भव्य समाधान शिबिर
Next Article भोसरी–दिघी मार्गावरील मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?