Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कुदळवाडीतील विष्णु ग्रीन्स परिसरातील कचरा समस्येवर १५ दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना; महापौर रवि लांडगे यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

कुदळवाडीतील विष्णु ग्रीन्स परिसरातील कचरा समस्येवर १५ दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना; महापौर रवि लांडगे यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ३० जुलै : कुदळवाडी परिसरातील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा साचण्याची समस्या तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने निर्माण होणारी अस्वच्छता, वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगाराला आग लावून होणारे वायू प्रदूषण तसेच परिसराच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध प्रश्न मांडले. या सर्व बाबींची महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.

त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नियमित स्वच्छता, बेकायदेशीर कचरा टाकण्यावर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी समन्वित कार्यवाही तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याबाबत निर्देश देण्यात आले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांच्या आत विष्णु ग्रीन्स परिसरातील कचरा समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश महापौर रवि लांडगे यांनी दिले. तसेच कचरा साचणार नाही, परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

“कुदळवाडी परिसरातील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा समस्या ही केवळ स्वच्छतेचा विषय नसून नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत प्रभावी उपाययोजना पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करून प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही”

……. रवी लांडगे.महापौर पिंपरी चिंचवड 

महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. परिसरात बेकायदेशीरपणे कचरा टाकणे किंवा जाळण्याच्या घटना आढळल्यास त्याची माहिती तातडीने महापालिकेला देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव
Next Article प्रभागातील नागरी समस्या तातडीने सोडवा : सभापती अभिषेक बारणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?