Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य दिंडी सोहळा
पिंपरी चिंचवड

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य दिंडी सोहळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 24, 2026Updated:July 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सलग दुसऱ्या वर्षी कामगार वारकरी मेळावा; दोन हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित

पिंपरी, दि.२४ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य दिंडी, कामगार वारकरी मेळावा आणि सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक, वारकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व धर्मीय भाविकांना वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसले यांनी सांगितले की, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून दिंडीला प्रारंभ होईल. मंदिराचे व्यवस्थापन श्री दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणींची प्रतिमा, संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तसेच माऊलींची पालखी सहभागी होणार आहे.

तुकारामनगर, वल्लभनगर आणि महेशनगर परिसरातून मार्गक्रमण करत दिंडी दुपारी सुमारे २.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात पोहोचेल. त्यानंतर कामगार वारकरी मेळावा, वैष्णव मेळावा, भजन-कीर्तन तसेच सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देहू आणि आळंदी येथील कीर्तनकार, भजनी मंडळे, वारकरी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या दिंडीत सुमारे दोन ते अडीच हजार श्रमिक, वारकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटकांतील भाविक सहभागी होणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकरशेठ जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 “वारकरी संप्रदाय हा समाजात समता, बंधुता, सेवा आणि मानवतेची प्रेरणा देणारा आहे. या पवित्र सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल भक्तीचा आनंद घ्यावा.”

…… यशवंतभाऊ भोसले,कामगार नेते.

Post Views: 39
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा… रवी लांडगे
Next Article डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार जाहीर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?