Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी समस्या सोडविण्यावर भर द्या :- अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी समस्या सोडविण्यावर भर द्या :- अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वच्छता, आरोग्य, क्रीडा व पायाभूत सुविधांसह स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची विविध विषयांना मंजुरी

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापालिका सभेत शहरातील क्रीडा सुविधा, स्वच्छता, आरोग्य, जलनिःसारण, सार्वजनिक सुविधा, माहिती-तंत्रज्ञान, स्मशानभूमी, रुग्णालय विकास तसेच विविध पायाभूत विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देणे, सुरू असलेल्या विकासकामांना गती देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये सातत्य राखणे या उद्देशाने विविध विषय सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आले.

सभेत मासुळकर कॉलनी येथील महापालिकेची व्यायामशाळा क्रीडा धोरणानुसार सेवाशुल्क तत्त्वावर ११ महिन्यांसाठी सिंहगर्जना मित्र मंडळ या संस्थेकडे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच सुधारित क्रीडा धोरण लागू झाल्यानंतर त्यातील सर्व अटी संबंधित संस्थेस बंधनकारक राहतील, अशी तरतूदही प्रस्तावात करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर व स्टिकर्स तयार करण्यासाठी झालेल्या खर्चास मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. तसेच स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, वॉटर प्लस, सेवन स्टार रेटिंग, आरआरआर सेंटर्स, आयसीसीसी डॅशबोर्ड, नवी दिशा उपक्रम आणि झिरो वेस्ट स्लम मॉडेल यांसारख्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी मराठी माहितीपट तयार करण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला.

अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत व गॅस दाहिनीची देखभाल आणि संचालन अखंडित सुरू राहावे यासाठी विद्यमान कामास मुदतवाढ देणे, आवश्यक वाढीव खर्चास तसेच सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प किवळे, नागसेननगर आणि रमाबाईनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राप्त निविदेस मंजुरी देऊन संबंधित ठेकेदारास काम देण्याबाबत विचार करण्यात आला.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी गावठाण परिसरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छता आणि देखभालीचे काम करणाऱ्या महिला बचत गटांना पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचे प्रस्तावही सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले. सार्वजनिक स्वच्छता सेवा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहन ट्रॅकिंग व व्यवस्थापन (VTM) प्रणालीचे काम नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्यासाठी विद्यमान कंत्राटास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच मुख्य लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरीसंदर्भातील विषयांचाही सभेत विचार करण्यात आला.

आरोग्य सुविधांचा विस्तार लक्षात घेऊन थेरगाव रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील उर्वरित बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव चर्चेस आला. वाढत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महापालिकेच्या विविध विभागांसाठी प्रोजेक्टर व स्क्रीन खरेदीसाठी करण्यात आलेल्या निविदेअंतर्गत झालेल्या खर्चाचे अवलोकन सभेपुढे ठेवण्यात आले.

रावेत येथील स्मशानभूमी प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) आणि नीरी यांनी सुचविलेल्या निर्देशांनुसार आवश्यक बदल करून काम पूर्ण करण्यासाठी वास्तुविशारदाची थेट नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्तावही सभेत विचारार्थ ठेवण्यात आला. पर्यावरणीय निकषांचे पालन करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यावर या प्रस्तावात भर देण्यात आला.

”पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्वच्छता, आरोग्य, क्रीडा, जलनिःसारण, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांमुळे नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देण्यास मदत होईल. विकासकामांमध्ये सातत्य राखत प्रत्येक प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक निर्णय घेतले जात आहेत.”

….. अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि पूर्वतयारीला प्राधान्य द्या – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम
Next Article ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई; नाल्यामधील पाइप काढून संपूर्ण नाला खुला
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?