Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा

पिंपरी….. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि समन्वयाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ पात्र नागरिकांना सुलभपणे मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, संबंधित रुग्णालयांशी समन्वय तसेच लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या कक्षामार्फत मदत केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि कामगारनगरी असल्याने अनेक कुटुंबांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयासाठी दोन आरोग्यमित्रांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली असून भविष्यात गरजेनुसार या सेवेचा विस्तारही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी मनोज शिंदे (८४१२९९५५९९), अभिजित पानखेडे (९११२४०४१८१) यांच्याशी संपर्क साधावा किंवा टोल-फ्री हेल्पलाईन १८०० २३३ २२‍०० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ४,८०० हून अधिक शासकीय व खासगी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांशी संलग्न आहेत. पात्र नागरिकांना कॅशलेस उपचाराचा लाभ वेळेत मिळावा यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या योजनांविषयी अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, शहरातील कोणताही नागरिक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष नागरिक आणि शासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करेल. पात्र रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, यासाठी या कक्षामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

याप्रसंगी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुप्रिया चांदगुडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, तसेच विविध पदाधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Next Article आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि पूर्वतयारीला प्राधान्य द्या – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?