Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»१० वर्षांपासून फरार बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

१० वर्षांपासून फरार बलात्कार व पॉक्सो प्रकरणातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; निगडी पोलिसांच्या ताब्यात दिला आरोपी

पिंपरी-चिंचवड, दि. २२ जुलै : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने बलात्कार व पॉक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कर्नाटक राज्यातून शोधून काढत अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात २०१६ साली गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२६/२०१६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७६ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ५(जे)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हनुमंत दुर्गाप्पा कुन्हाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गेल्या दहा वर्षांपासून पोलिसांना त्याचा माग काढता आला नव्हता.

दरम्यान, खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार रमेश मावसकर यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी कर्नाटक राज्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनिल कानगुडे यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून तो कुरागुंड, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी (कर्नाटक) येथे असल्याचे निश्चित केले.

या माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि पोलीस शिपाई निलेश जाधव यांच्या विशेष पथकाने कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल दहा वर्षांनंतर अटक करण्यात आल्याने गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
Next Article दशकपूर्तीनिमित्त रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा भव्य वाद्यपूजन सोहळा; पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा होणार सत्कार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?