Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सन्नी माने, राहुल गायकवाड व वामन कसबे यांच्या वारसांच्या खात्यात मदतीची १० लाख रुपये रक्कम जमा; उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

पिंपरी, दि. २२ जुलै २०२६ :-मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली असून, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

याअंतर्गत मृत सन्नी माने यांच्या कायदेशीर वारसांना एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या पत्नी मनीषा सन्नी माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच मृत राहुल गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांना एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, त्यांच्या पत्नी भाग्यश्री राहुल गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २.५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय मृत वामन कसबे यांच्या कायदेशीर वारस असलेल्या त्यांच्या पत्नी सुमन वामन कसबे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.

यापूर्वी मृत अक्षय सावंत यांच्या कायदेशीर वारसांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातही नियमानुसार १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे”

….डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पात्र वारसांना नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल”

…… रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबई येथे २३ जुलै रोजी ‘खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन’
Next Article प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?