Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवडच्या वीज प्रश्नावर आमदार शंकर जगताप आक्रमक ;महावितरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश! 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडच्या वीज प्रश्नावर आमदार शंकर जगताप आक्रमक ;महावितरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश! 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
निष्काळजीपणामुळे वीज खंडित झाल्यास गय केली जाणार नाही; ‘समन्वय साधून काम करण्याच्या सूचना व अखंड वीजपुरवठ्यासाठी तातडीने बैठकांचा धडाका

पिंपरी, १६ जुलै (प्रतिनिधी): मागील आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस कोसळला. यावेळी रावेत, किवळे आणि मामुर्डीतील नागरिकांना सलग ४८ तास अंधारात राहावे लागले होते. इतका वेळ वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले , सोसायट्यांमधील पाणी उपसा बंद पडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांच्या या अतोनात हाल आणि त्रासाची गंभीर दखल घेत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने गुरुवारी संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, ठरवून दिलेल्या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात तब्बल ४८ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. महापालिका किंवा खासगी कंत्राटदार रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या मनमानी खोदाईदरम्यान महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. या निष्काळजीपणामुळेच वीज पुरवठा खंडित झाल्याचे बैठकीत उघड झाले.

आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालय झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वाव्हळकर, रावेत-वाल्हेकरवाडी अध्यक्ष मोहन राऊत, श्रीकांत भोंडवे, दीपक भोंडवे यांच्यासह महावितरणचे उपअभियंता रत्नदीप काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, अधीक्षक अभियंता श्रीयुत. मुंडे, तसेच श्रीयुत . लहाने, सुरेश गवारे आणि आशुतोष थोरात आदी उपस्थित होते.

समन्वयाशिवाय खोदाई न करण्याचे कडक निर्देश

या बेजबाबदार कारभाराची आमदार शंकर जगताप यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “भविष्यात कोणत्याही विभागाने महावितरणशी परस्पर समन्वय साधल्याशिवाय खोदाईची कामे करू नयेत. तसेच, परिसरातील धोकादायक डीपींची तातडीने पाहणी करून त्या दुरुस्त कराव्यात.” नागरिकांना पुन्हा अशा भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सांगितलेल्या सर्व उपाययोजनांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

गहुंजे येथे उपकेंद्र उभारणार

भविष्यात या भागातील विजेची वाढती मागणी आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे नियोजन करण्यात आले आहे. गहुंजे येथे (२२०/२२ केव्ही, ३०० MVA )क्षमतेचे नवीन महापारेषण उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज यंत्रणा अधिक सक्षम होईल. या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, पुढील आठवड्यात महापारेषण आणि सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक घेऊन या कामाला गती दिली जाणार आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनामदेवराव जाधव यांच्या विरोधात पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन २४ तासाच्या आत कारवाई करा – उषामाई कांबळे
Next Article नगर – मनमाड रस्त्याचे काम सुरू, प्रवाशांनी काळजी घ्यावी… ज्ञानेश्वर बनसोडे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?