Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. त्यातील सुरुवातीस ५ नागरिक सुखरुप बाहेर आले. इमारतीत अडकलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य राबविले. शर्तीच्या प्रयत्नानंतर इमारतीत अडकलेल्या ६ नागरिकांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेल्या नागरिकांना पुढील उपचारार्थ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसेच नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे प्रत्यक्ष उपस्थित असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

सध्या अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ) चे जवान तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी कार्यरत असून, जेसीबी आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्याचे काम सुरू आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या २ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यात कचऱ्याचा ढीग वाहून इमारतीवर कोसळल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या २३ नागरिकांपैकी ५ नागरिक सुरुवातीला बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या १८ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते, यामध्ये ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू असून आत अडकलेल्या ३ नागरिकांसोबत संवाद सुरू आहे. त्यांच्या पायावर मलबा पडला असल्याने तो हटवून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय इतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितपणे त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. सकाळपर्यंत हे बचावकार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

बचावकार्यात सुखरुप बाहेर पडलेल्या व्यक्तींची नावे –

सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह,विजय सकपाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांना बचावकार्यादरम्यान सुखरुप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना! कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन; तीन मजली इमारत गाडली, १९ जण अडकल्याची भीती
Next Article भावपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; आळंदीकर ग्रामस्थांचा अश्रुपूर्ण निरोप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?