Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पीएमपीएमएलच्या १००० सीएनजी बस खरेदीत मोठा घोटाळा?; निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएलच्या १००० सीएनजी बस खरेदीत मोठा घोटाळा?; निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
ITMS सहित निविदा, नंतर बंद लिफाफ्यात ITMS वगळून दर मागविण्याचा आरोप; एल-१ बदलण्यामागे कोणाचा हस्तक्षेप? स्वतंत्र चौकशीची मागणी

पुणे | प्रतिनिधी…पीएमपीएमएलच्या १००० सीएनजी स्वमालकीच्या बसेस (ITMS सहित) खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निविदेच्या अटींमध्ये बदल, बंद लिफाफ्यातून नव्याने दर मागविणे, एल-1 व एल-2 क्रमवारीत बदल आणि अखेरीस पुन्हा ITMS सहितच बसेस खरेदी करण्याचा निर्णय यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीएमपीएमएलने सुरुवातीला ITMS सहित १००० सीएनजी बसेस खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेत टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड या दोन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ITMS सहित सादर झालेल्या दरांमध्ये टाटा मोटर्स एल-1 तर अशोक लेलँड एल-2 असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र त्यानंतर अचानक ITMS वगळून बंद लिफाफ्यातून पुन्हा दर मागविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अंदाजे ₹ ५०० ते ₹ ६०० कोटींच्या कामासाठी बंद लिफाफ्यातून दर मागविण्यात आल्याबाबत कोणत्या शासन नियमाचा आधार घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

एल-१ बदलण्यासाठीच नियम बदलले का?

बंद लिफाफ्यातील नव्या दरांनंतर अशोक लेलँड एल-१ तर टाटा मोटर्स एल-२ ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार अशोक लेलँडला ६०० आणि टाटा मोटर्सला ४०० बसेसचा कार्यादेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मूळ निविदेतील एल-१ क्रमवारी बदलण्यासाठीच ही प्रक्रिया राबविण्यात आली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

ITMS काढले… आणि पुन्हा बसविले!

बस नोंदणीसाठी ITMS अनिवार्य असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा प्रत्येक बसमध्ये ITMS बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक बसमागे सुमारे ₹ ३ ते ₹ ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ITMS सहित निविदा असताना मध्येच ITMS वगळण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

संचालक मंडळाला डावलले का?

कामाच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी संचालक मंडळाची पूर्वमान्यता घेण्यात आली होती का, तसेच नंतरच मंडळासमोर विषय ठेवण्यात आला का, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच संबंधित निर्णय प्रक्रियेत शासन नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी

कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीशी संबंधित या प्रकरणात संपूर्ण निविदा प्रक्रिया, अटींमधील बदल, बंद लिफाफ्यातून दर मागविण्याचा निर्णय, एल-1 बदलण्यामागील कारणे तसेच संबंधित अधिकारी आणि निर्णय प्रक्रियेची भूमिका यांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“जर अखेरीस ITMS सहितच बसेस खरेदी करायच्या होत्या, तर मध्येच ITMS वगळून बंद लिफाफ्यातून दर मागविण्याची गरज काय होती?” हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, या संपूर्ण प्रकरणात संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदरवर्षी कोट्यवधींचा खर्च… तरीही पिंपरी-चिंचवड पाण्याखाली!…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
Next Article आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा तयार करणार-आयुक्त डॉ.सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?