Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दरवर्षी कोट्यवधींचा खर्च… तरीही पिंपरी-चिंचवड पाण्याखाली!…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवड

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च… तरीही पिंपरी-चिंचवड पाण्याखाली!…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नैसर्गिक नाले-ओढ्यांचे अस्तित्व धोक्यात; शाश्वत जलव्यवस्थापनाची नागरिकांची जोरदार मागणी

काँक्रीटीकरण, अतिक्रमणे आणि जलमार्गांचे अरुंदीकरण ठरत आहे पाणी तुंबण्याचे मुख्य कारण

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही शहरातील प्रमुख रस्ते, चौक, महामार्ग आणि निवासी भाग प्रत्येक पावसात जलमय होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अल्पकालीन पाऊस झाला तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, वाहनांचे नुकसान आणि मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

याप्रकरणी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देत पाणी तुंबण्याच्या समस्येवर तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात या समस्येमागे केवळ अतिवृष्टी नसून शहरातील नैसर्गिक जलप्रवाह, नाले-ओढे आणि पाणी मुरण्याच्या व्यवस्थेचा झालेला ऱ्हास हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मते, एकेकाळी शहरातील मातीचे चर, नैसर्गिक नाले, ओढे, तलाव, तळी आणि मोकळ्या जागा पावसाचे पाणी सहज वाहून नेत आणि मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवत होत्या. मात्र अनियंत्रित शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर झालेले काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिवापर, रस्त्यालगतची वाढती बांधकामे आणि नैसर्गिक जलमार्गांवरील अतिक्रमणे यामुळे ही व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा, सोसायट्यांची आवारे आणि अगदी झाडांच्या बुंध्यांभोवतीही काँक्रीट टाकल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे संपूर्ण पाणी जलनिस्सारण यंत्रणेवर अवलंबून राहत असून ती अल्पावधीतच अपुरी पडते. परिणामी अनेक भागांत शहरी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच शहरातील अनेक नैसर्गिक नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याचे पारंपरिक मार्ग अरुंद झाले असून काही ठिकाणी त्यांच्यावर अतिक्रमणे झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात महानगरपालिकेने शहरातील सर्व नैसर्गिक जलप्रवाह, नाले, ओढे, तलाव आणि पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक मार्गांचे वैज्ञानिक सर्वेक्षण व डिजिटल मॅपिंग करावे, त्यांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यातील सर्व विकासकामांना मंजुरी देताना नैसर्गिक जलप्रवाह अबाधित राहतील आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरेल, यासाठी कठोर निकष लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

शहरात रेन वॉटर रिचार्ज झोन, रेन गार्डन, जैविक जलनिस्सारण व्यवस्था (बायो-स्वेल्स), परमेएबल पेव्हमेंट, झिरपण खड्डे आणि खुल्या मातीच्या जागांचे संरक्षण यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरजही नागरिकांनी अधोरेखित केली आहे.

“शहराचा विकास म्हणजे केवळ काँक्रीटचे जंगल उभारणे नव्हे; तर नैसर्गिक जलप्रवाह, भूजल आणि पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.

पाणी तुंबण्याच्या समस्येवर दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजनांवर मोठा खर्च करण्याऐवजी नैसर्गिक जलमार्गांचे संरक्षण, अतिक्रमणमुक्ती, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता वाढविणे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने सर्वंकष आणि दीर्घकालीन धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ
Next Article पीएमपीएमएलच्या १००० सीएनजी बस खरेदीत मोठा घोटाळा?; निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?