Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी चिंचवड

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
सुमारे १,५०० नागरिकांची बोटीच्या सहाय्याने सुटका; ५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ७५० जनावरेही वाचविली 

पिंपरी, दि. ७ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले.

अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे २० ते २५ भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे १,५०० नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.

याशिवाय, चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे यशस्वी बचावकार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांमध्ये वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. ताथवडे परिसरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात हलविण्यात आले. काळेवाडी येथे गर्भवती महिला, लहान मुले तसेच अनेक वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले, तर जुनी सांगवी परिसरात पूराच्या पाण्यात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली.

पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या एकूण सुमारे ५,००० नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, तेथे त्यांच्यासाठी भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे ७५० जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय, तत्परता आणि धाडसाच्या बळावर ही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळली. या संपूर्ण बचाव मोहिमेत उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर आणि इतर अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

तसेच नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल स्वीकारणे, माहितीचे समन्वयन करणे आणि बचाव पथकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली. सध्या देखील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये अग्निशमन विभागाचे बचावकार्य सुरू असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे तसेच आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी २४x७ सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर
Next Article साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम – महापौर रवि लांडगे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?