Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर
पिंपरी चिंचवड

पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त पुरस्कार वितरण; डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार सन्मान

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी.…नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात थरार न्यूज नेटवर्कचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. ही माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्क येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, उद्योग, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

थरार न्यूज नेटवर्कचे संपादक रोहित खर्गे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सामाजिक बांधिलकी जपली आहे. विविध जनजागृती मोहिमा, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीने त्यांची ‘भला माणूस’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष तथा उद्योजक सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब तसेच राष्ट्रपती पोलीस पदक विजेते ज्येष्ठ कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे शहरातील साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Next Article अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?