Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि.२२ जून : जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर,उषा बेन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातत्याने योग करणारा व्यक्ती हा कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये असली तरी आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकतो. त्यामुळे योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. नियमितपणे योग करून आपण आपले शरीर निरोगी व मन प्रसन्न ठेवूया, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताने मांडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीत आणि कुठलाही विरोध न होता मंजूर झालेला हा प्रस्ताव आहे. भारताने दिलेल्या प्रस्तावानुसार आज जगभरात योग होत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व जगाला पटले आहे. विश्वामध्ये योग विद्या आणि योग चिकित्सेबदल मोठे कुतूहल निर्माण झाले असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

व्यक्ती ही केवळ शरीर नसून मन आणि आत्मा सुद्धा असल्याचे अधोरेखित करीत मुख्यमंत्री म्हणाले, माणसाचे मन निसर्गाशी जुळलेले आहे. त्यामुळेच योग विद्येमध्ये केवळ शरीराचा विचार न करता मन, आत्मा आणि शरीर या तिन्हींचा विचार करण्यात आलेला आहे. योग विद्येमध्ये मनाचा निसर्गातील तत्वांशी असलेला संबंध हा पुनर्जीवित करण्यात येतो. सातत्यपूर्ण योग केल्याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यावरही होतो.

कार्यक्रम प्रसंगी शिवप्रकाश यांनीही आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासने केली. कार्यक्रमाला योगशिक्षक, योग करणारे नागरिक उपस्थित होते.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेतील ‘सल्लागार राज’वर अखेर गंडांतर!
Next Article ‘स्मार्ट मीटर’चा सक्तीचा फंडा बंद करा!…. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण; भारत-मॉरिशस मैत्रीचा नवा अध्याय

June 15, 2026

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 11, 2026

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 10, 2026

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी नामांकनांना सुरुवात

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

पिंपरी, दि. २९ जून २०२६ : मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न…

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?