Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»‘स्मार्ट मीटर’चा सक्तीचा फंडा बंद करा!…. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन
महाराष्ट्र

‘स्मार्ट मीटर’चा सक्तीचा फंडा बंद करा!…. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय वीज मीटर बदलणे थांबवा; महावितरणला ह्युमन राईट असोसिएशनचा इशारा

रत्नागिरी | प्रतिनिधी.संतोष नाईक..…कोकणातील घरगुती वीज ग्राहकांच्या घरांमध्ये त्यांच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी ही पद्धत  तात्काळ बंद करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कोकण परिमंडळ, रत्नागिरीचे मुख्य अभियंता अनिल डोळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पारंपरिक वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोणत्याही ग्राहकाचा वीज मीटर बदलण्यापूर्वी संबंधित ग्राहकाची स्पष्ट आणि लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही बाब ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारी असून प्रशासनाने त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

संतोष नाईक यांनी मुख्य अभियंता अनिल डोळे यांच्याकडे कोकण परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंत्यांना याबाबत स्पष्ट आणि सक्त सूचना देण्याची मागणी केली. ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही मीटर बदलले जाणार नाहीत, याची खात्री करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.या वेळी कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण उपस्थित होते.

‘ग्राहकांचा अधिकार अबाधित राहिलाच पाहिजे’

स्मार्ट मीटर बसवणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, ग्राहकांना संपूर्ण माहिती देणे आणि त्यांच्या लेखी संमतीनंतरच मीटर बदलणे हा मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकणातील स्मार्ट मीटर मोहिमेवर आता नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संघटनेच्या प्रमुख मागण्या….

🔴ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय मीटर बदलू नयेत.

🔴स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी संपूर्ण माहिती द्यावी.

🔴सर्व अभियंता कार्यालयांना स्पष्ट सूचना जारी कराव्यात.

🔴ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.

“संमतीशिवाय स्मार्ट मीटर नको; ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत.”

— संतोष नाईक, कोकण विभागीय अध्यक्ष, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन.

 

Post Views: 53
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article जागतिक संगीत दिनानिमित्त किवळेतील ज्येष्ठांचा सुरेल जल्लोष
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट निर्देश मुंबई, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ.…

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?